WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो...
WTC Final

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) WTC अंतिम सामन्याबद्दल आपलं भाकित वर्तवलं आहे. (WTC Final 2021 India vs New Zealand Who Will Win Brett lee prediction)

Akshay Adhav

|

Jun 05, 2021 | 8:03 AM

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये (India tour of England) पोहोचला आहे. भारताला या इंग्लंड दौऱ्यात एकूण सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका (India vs England Test Series) विराटसेना खेळेल. 18 जून ते 23 जून दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडशी (India vs new Zealand) वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन हात करेल. ही मॅच साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे होणार आहे. या सामन्याची सगळ्या क्रिकेट जगताला उत्सुता लागून राहिली आहे तशी ती खेळाडूंना देखील लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) या सामन्याबद्दल आपलं भाकित वर्तवलं आहे. (WTC Final 2021 India vs New Zealand Who Will Win Brett lee prediction)

ब्रेट ली ची भविष्यवाणी!

साऊथहॅम्प्टनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं मैदान जर मारायचं असेल तर दोन्ही संघांना साहजिक उत्तम खेळ करुन दाखवावा लागेल. दोन्ही संघात अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. ते फॉर्मात देखील आहेत. बॅटिंगमध्ये दोन्ही संघांकडे एकाहून एक सरस खेळाडू आहेत पण जी टीम बोलिंगमध्ये सर्वोतम कामगिरी करेल, ती टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं मैदान मारेल, अशी भविष्यवाणी ब्रेट ली ने वर्तवली आहे.

WTC अंतिम सामन्यात कोण कुणाला आस्मान दाखवणार?

ब्रेट ली ने आयसीसीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अनुषंगाने त्याने भारतीय संघ आणि न्यूझीलंडच्या संघाविषयी आपलं मत मांडलं. ब्रेट ली म्हणाला, “दोन्ही संघांच्या बाबतीत जर आपण बॅटिंगबद्दल बोलायचं झालं तर इथे बरोबरी होईल. कारण दोन्ही संघांकडे तितकेच ताकदीचे फलंदाज आहेत. ज्यांच्याकडे कोणत्याही क्षणी मॅच पलटवण्याची क्षमता आहे. परंतु गोलंदाजी असा विभाग आहे जो मॅचमध्ये हार किंवा विजय ठरवू शकतो. जी टीम चांगली गोलंदाजी करेल, ती टीम मॅच जिंकेल”

न्यूझीलंडला फायदा मिळणार

WTC अंतिम सामना साऊथहॅम्प्टन येथे होणार आहे. इथलं वातावरण पाहता इथली परिस्थिती न्यूझीलंडला अनुकुल असेल. कारण न्यूझीलंडच्या परिस्थितीसमान इथलं वातावरण आहे, असं ब्रेट ली म्हणाला. तर दुसरीकडे पीच सुपर फास्ट असणार नाही, असं मतंही त्याने नोंदवलं. बॅट्समनना पीच त्रास देणार नाही, किंबहुना त्यांना खेळायला अडचण करणार नाही, असं तो म्हणाला.

WTC Final 2021 India vs New Zealand Who Will Win Brett lee prediction

हे ही वाचा :

भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजची रोहित शर्माबद्दल तक्रार, म्हणाला…

तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें