AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP Selfie Camera असलेला स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळेल मोठी 7000mAh बॅटरी, जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ स्मार्टफोन

तुम्ही सेल्फी काढण्याचे शौकीन असाल तर 50-मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या या एका स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात. ज्यामध्ये तुम्हाला उत्तम कॅमेऱ्यासह दमदार बॅटरी पॉवर देखील मिळणार आहे तेही स्वस्तात. चला तर मग या स्वस्त 5 जी स्मार्टफोनची किंमत किती असेल आणि तो तुम्ही कोठे खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात.

50MP Selfie Camera असलेला स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळेल मोठी 7000mAh बॅटरी, जाणून घ्या कोणता आहे 'हा' स्मार्टफोन
realme-narzoImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 14, 2026 | 12:41 PM
Share

तुम्ही जर सेल्फी काढण्याचे खूप शौकीन असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असलेला सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. तर या स्वस्त फोनचे नाव आहे Realme Narzo 90 5G. या फोनची किंमत काय आहे? 50-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त या डिव्हाइसमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत? चला जाणून घेऊयात.

Realme Narzo 90 5G ची भारतात किंमत

हा रियलमी स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट ॲमेझॉनवर 18 हजार 999 रूपयांना विकला जात आहे. त्यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 19 हजार 999 रूपयांना विकला जात आहे. या किंमत श्रेणीमध्ये हा रियलमी फोन मोटोरोला G96 5G, विवो T4x 5G आणि आयकू Z11x 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

हा फोन तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर Realme.com वर आणि ॲमेझॉनवर कार्बन ब्लॅक आणि व्हिक्टरी गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे.

रियलमी नार्झो 90 5G वैशिष्ट्ये

बॅटरी: या फोनमध्ये 60W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन 31 मिनिटांत 1 ते 50 टक्के चार्ज होऊ शकतो. याशिवाय हा फोन रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

डिस्प्ले: या हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट असलेली 6.57-इंचाची AMOLED स्क्रीन आहे. तसेच यात 4000 nits ची कमाल ब्राइटनेस आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा, २-मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 मॅक्स प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

विशेष वैशिष्ट्ये: या फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP69 रेटिंग मिळाले आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.