Airtel युजर्ससाठी गुड न्यूज, IPL चे सामने मोफत पाहता येणार

आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे.

Airtel युजर्ससाठी गुड न्यूज, IPL चे सामने मोफत पाहता येणार
IPL 2021 Airtel
अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 08, 2021 | 10:04 AM

मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. (Bcci Announces  Schedule For Ipl 2021)

क्रिकेटप्रेमी आता आयपीएल कधी सुरु होतंय, याच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलचे हे सामने टीव्हीवर तर पाहायला मिळणार आहेतच, सोबतच हे सामने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरदेखील पाहू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत, तुमच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्येच तुम्ही आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. (Airtel offering free Hotstar Subscription in 5 Plans, you Can catch Every Match of IPL 2021)

आयपीएलदरम्यान एअरटेलने (Airtel) आपल्या युजर्ससाठी एक खास प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनअंतर्गत, प्रत्येक युजर कुठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याची थेट प्रक्षेपण पाहू शकतो. एअरटेलच्या प्रीपेड प्लॅन युजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. एअरटेलने 400 रुपयांपासून ते 2698 रुपयांपर्यंत वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सना हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळेल. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ओटीटी राईट्स हॉटस्टारकडे असल्याने आयपीएलचे सर्व सामने हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

Airtel चा 401 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 401 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.

Airtel चा 448 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 448 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

Airtel चा 2698 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 2698 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 356 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

सामने कसे पाहायचे?

एरटेलचा यापैकी कोणताही प्लॅन तुम्ही घेतलात तर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचं अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन नंबर आणि ओटीपी टाकून तुमचं सब्सक्रिप्शन अॅक्टिव्हेट करु शकता. सब्सक्रिप्शन अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही हॉटस्टारवर आयपीएलचे सर्व सामने मोफत पाहू शकता.

इतर बातम्या

देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर

एअरटेल, जिओ आणि व्हीआयचे बेस्ट प्लान, 56 दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य पहा डिस्ने + हॉटस्टार, झी 5 प्रीमियम आणि प्राईम व्हिडिओ

(Airtel offering free Hotstar Subscription in 5 Plans, you Can catch Every Match of IPL 2021)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें