Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी किंमत, जास्त डेटा अन् सोबत OTT चे सबस्क्रिप्शन; Airtel च्या ग्राहकांना एका प्लॅनमध्ये मिळणार सर्वकाही…

एअरटेल तुम्हाला स्वस्त डेटा प्लॅन देत आहे. जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर हे प्लॅन तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात. एअरटेलच्या या स्वस्त डेटा प्लॅनवर आणि त्यांच्यासह तुम्हाला मिळत असलेल्या फायद्यांबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेऊयात.

कमी किंमत, जास्त डेटा अन् सोबत OTT चे सबस्क्रिप्शन; Airtel च्या ग्राहकांना एका प्लॅनमध्ये मिळणार सर्वकाही...
airtel
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 7:19 PM

भारतीय टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी कमी किमतीच्या चांगल्या सुविधा देणारे प्लॅन लाँच करत असतात. जर तुम्ही कमी खर्चात जास्त काळ टिकणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल त्याच्या ग्राहकांसाठी 161 रुपयांच्या किंमतीत 30 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड डेटाचाही फायदा मिळत आहे. एअरटेल आणखी अनेक प्लॅन ऑफर करत आहे जे आणखी चांगल्या फायद्यांसह येतात. याव्यतिरिक्त तुम्ही विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील मिळवू शकता.

161 रुपयांच्या प्लॅनमध्ये या सर्व सेवा उपलब्ध

एअरटेलचा हा प्लॅन घेतल्यास तुम्हाला 30 दिवस कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही डेटाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. 30 दिवसात 12 जीबी डेटा वापरता येईल. दरम्यान एअरटेलकडून याच किमतीच्या रेंजमधील इतर प्लॅन्स पाहिल्यास तुम्हाला यापेक्षा जास्त डेटा बेनिफिट्स मिळू शकतात.

एअरटेलचा 181 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह 15 जीबी डेटा फ्री मिळतो. तुम्ही या डेटाचा वापर ऑनलाइन चित्रपट, वेब सीरिज पाहण्यासाठी आणि गेम खेळण्यासाठी करू शकता. या प्लॅनमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देखील यात समाविष्ट आहे. सोनी लिव्ह आणि पंजाबी चित्रपटांचा समावेश असलेल्या चौपाल ॲपसह 22 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचे तुम्हाला सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

199 च्या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा ऑप्शन चा समावेश

एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा फायदा मिळतो. 199 रुपयांच्या खर्चात तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देखील समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणताही प्लॅन पाहू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कोणतीही योजना निवडू शकता.

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.