Android फोनला द्या iPhone चा लूक, ही ट्रिक अशी करेल धूम

iPhone 15 | जर तुम्हाला पण अँड्राईड फोनचा इंटरफेस आयफोनसारखा करायचा असेल तर ही ट्रिक तुम्हाला एकदम आवडेल बरं का! म्हणजे अँड्राईड फोनमध्येच आयफोनचा अनुभव घेता येईल. तुमच्या मित्रांना पण तुम्ही या ट्रिकने इंप्रेस करु शकता. तुमच्या बजेटमध्येच किफायतशीर मोबाईल, आयफोनमध्ये बदलेल..

Android फोनला द्या iPhone चा लूक, ही ट्रिक अशी करेल धूम
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:48 AM

नवी दिल्ली | 6 February 2024 : आयफोन खरेदी करणे ही अनेकांसाठी चैनेची बाब आहे. अनेकांना तर बजेटच्या चिंतेमुळे आयफोनच्या कव्हरवरच समाधान मानावे लागते. पण तुमच्या अँड्राईड मोबाईलमध्ये सुद्धा आयफोनसारखा अनुभव घेता येऊ शकतो. तुमचा अँड्राईड फोनच आयफोन होऊ शकतो. ही एक सोपी ट्रिक तुमच्या अँड्राईड फोनचा इंटरफेस बदलवून टाकेल. या ट्रिकमुळे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड फोनची होम स्क्रीन, एप आयकॉन, विजेंट आणि लॉक स्क्रीन आयफोन सारखा बदलवू शकता.

iPhone 15 Launcher ऐप

  • त्यासाठी तुम्हाला अँड्रॉईड फोनच्या Google Play Store जावे लागेल.
  • आता iPhone 15 Launcher लिहा आणि सर्च करा.
  • त्यानंतर तुम्ही एप इन्स्टॉल करा. एप ओपन करा, डाऊनलोड पर्याय निवडा.
  • अटी आणि शर्ती स्वीकारा आणि परवानगी द्या.
  • एपला तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे सेट करु शकता.
  • तुमच्या फोनची होम स्क्रीन लेआऊट, एप आयकॉन, विंजेट आणि लॉक स्क्रीन बदलून जाईल.

होम स्क्रीन बदला

हे सुद्धा वाचा

तुमच्या मोबाईलची होम स्क्रीनला आयफोनसारखी करण्यासाठी “Home Screen” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे होम स्क्रीन लेआऊट मिळतील. यामधील एक निवडा. तुम्ही आयकॉन आणि विजेंट बदलू शकता. त्यामुळे होम स्क्रीन बदलून अँड्रॉईड मोबाईलला आयफोनसारखा लूक देता येईल.

App आयकॉन बदला

एपचा आयकॉन बदलण्यासाठी “App Icons” च्या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही आयकॉन पॅक निवडू शका. तुम्ही तुमचे पर्सनल एप्सचे आयकॉन पण बदलवू शकता. हे आयकॉन तुम्हाला आयफोनसारखा फिल देतील. आयफोनमध्ये जसे आयकॉन दिसतात, तसे तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील.

विंजेट आणि लॉक स्क्रीन बदला

विजेंट बदलण्यासाठी “Widgets” चा पर्याय निवडा. त्यानंतर विजेंटचा आकार आणि ठिकाण पण निवडता येऊ शकते. लॉक स्क्रीन बदलण्यासाठी “Lock Screen” च्या पर्यायवर क्लिक करा. लॉक स्क्रीनचा टाईप निवडा. तुम्हाला लॉक स्क्रीनचा वॉलपेपर पण बदलता येईल. यामुळे तुमच्या अँड्राईड मोबाईलचा चेहरा-मोहरा बदलेल. पण त्याची क्षमता आयफोन सारखी होणार नाही, हे लक्षात ठेवा.

Non Stop LIVE Update
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.