14000 रुपयांच्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन, लिस्टमध्ये Samsung, Realme, Redmi चे टॉप 5 फोन

5जी कनेक्टिव्हिटी असलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही खास 5जी स्मार्टफोन्सचे पर्याय देणार आहोत.

Jan 31, 2022 | 11:25 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 31, 2022 | 11:25 AM

5जी कनेक्टिव्हिटी असलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही खास 5जी स्मार्टफोन्सचे पर्याय देणार आहोत. यामध्ये Samsung, Realme, Redmi, Oppo आणि मोटोरोलाचे पर्याय आहेत. चला तर मग जाणून घेऊयात 14000 रुपयांच्या रेंजमध्ये असलेले टॉप 5G स्मार्टफोन्सबद्दल.

1 / 6
Moto G71 5G हा स्मार्टफोन 18999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. या मोबाईलमध्ये 6.4 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो.

2 / 6
Samsung Galaxy F42 5G हा फोन 15999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. यामध्ये 1 टीबीपर्यंतचे एसडी कार्ड इन्सर्ट करता येतं. या मोबाईलमध्ये 6.6 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

3 / 6
Realme 8 5G हा स्मार्टफोन 16499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. यामध्ये तुम्ही 1 टीबीपर्यंतचे एसडी कार्ड जोडू शकता. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तसेच यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

4 / 6
OPPO A53s 5G हा स्मार्टफोन तुम्ही 15990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. यात 1 टीबीपर्यंतचे स्टोरेज कार्ड जोडू शकता. यामध्ये 6.52 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक 700 चिपसेटसह येतो.

5 / 6
Redmi Note 10T 5G हा फोन तुम्ही 14999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. हा फोन 90hz डिस्प्ले रेट्ससह येतो. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट मिळेल. या मोबाइल फोनमध्ये 6.5 इंचांचा डिस्प्ले दिला गेला आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें