BSNL चा सहा महिन्यांसाठी नवा प्लान

BSNL चा सहा महिन्यांसाठी नवा प्लान

मुंबई : सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने नुकतेच आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केले आहेत. यासोबतच अनेक नवीन प्रीपेड प्लान त्यांनी बाजारात आणले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आता 599 रुपयांचा प्लान सुरु केला आहे. विसेष म्हणजे या नवीन प्लानमध्ये ग्राहकांना व्हॅलिडिटी एक्सटेंशनचा फायदा सर्वात जास्त होणार आहे. तब्बल 180 दिवस म्हणजे सहा महिन्याची व्हॅलिडिटी या […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने नुकतेच आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केले आहेत. यासोबतच अनेक नवीन प्रीपेड प्लान त्यांनी बाजारात आणले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आता 599 रुपयांचा प्लान सुरु केला आहे. विसेष म्हणजे या नवीन प्लानमध्ये ग्राहकांना व्हॅलिडिटी एक्सटेंशनचा फायदा सर्वात जास्त होणार आहे. तब्बल 180 दिवस म्हणजे सहा महिन्याची व्हॅलिडिटी या नव्या प्लॅनमध्ये दिली जाणार आहे.

BSNL च्या नवीन 599 रुपयांचा प्लान पाहिला तर यामध्ये व्हॅलिडिटी एक्सटेंशन देण्यात आली आहे. BSNL चा कोणताही प्रीपेड प्लान या नवीन प्लानच्या मदतीने तुम्ही 180 दिवसापर्यंत प्लानची व्हॅलिडिटी वाढवू शकता.

या 180 दिवसांमध्ये ग्राहकाला फ्री लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मिळणार. दरम्यान हे कॉल्स दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये केले जाऊ शकत नाही. कारण BSNL आपली सेवा या दोन शहरात देत नाही. जर तुम्ही BSNL चा कोणताही प्लान वापरत असाल आणि तुमच्या प्लॅनची व्हॅलिडिटी तुम्ही अपडेट करणार असाल, तर 599 रुपयांचा नवीन प्लॅनने रिचार्ज करा आणि 180 दिवसापर्यंत तुम्ही व्हॅलिडिटी वाढवू शकता. हा प्लान सध्या आंध्र-प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरु करण्यात आला आहे.

BSNL ने नुकतेच आपल्या अॅन्युअल ब्रॉडब्रँड प्लान्समध्ये 25 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर दिली आहे. पहिले कॅशबॅक ऑफरची व्हॅलिडिटी 31 डिसेंबरपर्यंत दिली जात होती. म्हणजेच ग्राहकांना अॅन्युअल ब्रॉडब्रँड प्लान खरेदी केल्यावर 25 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर BSNL क्रेडिट पद्धतीने ग्राहकांना देणार आहे. या कॅशबॅक ऑफरचा फायदा ग्राहकांना भविष्यात रिचार्ज करताना मिळणार आहे. याशिवाय कंपनीने 349 रुपयांचा प्लानची व्हॅलिडिटीही 54 दिवसांवरुन आता 64 दिवसांपर्यंत वाढवली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें