सोनं आणि हिरे जडीत iPhone 11 Pro लाँच, किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल

रशियाची कंपनी caviar ने iPhone 11 Pro चं नवीन लग्झरी डिजाईन लाँच केलं आहे (iPhone 11 Pro launched). या नवीन मॉडेलचं नाव 'विक्ट्री' ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे iPhone 11 Pro च्या या नवीन मॉडेलच्या बॅकवर सोनं आणि हिरे जडलेले आहेत

सोनं आणि हिरे जडीत iPhone 11 Pro लाँच, किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल

मुंबई : रशियाची कंपनी caviar ने iPhone 11 Pro चं नवीन लग्झरी डिजाईन लाँच केलं आहे (iPhone 11 Pro launched). या नवीन मॉडेलचं नाव ‘विक्ट्री’ ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे iPhone 11 Pro च्या या नवीन मॉडेलच्या बॅकवर सोनं आणि हिरे जडलेले आहेत (Gold and Diamond design iPhone 11 Pro).

या iPhone 11 Pro च्या बॅक पॅनलवर कोरण्यात आलेला ‘V’ लेटर रिअर पॅनलला दोन भागांमध्ये विभागतो. नुकताच लाँच झालेल्या iPhone 11 सीरिजच्या फोनच्या चौकार सेटअपमुळे अॅप्पल कंपनी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे caviar ने नव्या डिजाईनच्या कॅमरा सेटअपमध्ये याला गायब केलं आहे.

iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या दोन्ही लिमिटेड एडिशनचे वेगवेगळे हॅण्ड-क्राफ्टेड डिजाईन उपलब्ध आहेत. Caviar ने नवीन आयफोन डिजाईनला शॉक-प्रुफ बॉडीला मजबूत मेटल फ्रेमने कव्हर करण्यात आलं आहे.

एडिशनल स्क्रीन प्रटेक्शनसोबत या डिवाईसची किंमत 4,000 डॉलर म्हणजेच जवळपास 2,84,000 रुपयांपासून सुरु होईल. विक्ट्री टायटेनिअम यापैका सर्वात स्वस्त व्हेरिएंट आहे. 64 जीबी स्टोरेज असलेल्या या आयफोनची किंमत 4,290 डॉलर म्हणजेच जवळपास 3,40,000 रुपये इतकी आहे. स्टोरेज आणि आणखी चांगल्या व्हेरिएंटसाठी ही किंमत आणखी वाढेल.

बॅक पॅनलवर ब्लॅक एलिगेटर लेदर फिनीशसोबत या लग्झरी स्मार्टफोनची किंमत 12,000 डॉलर म्हणजेच जवळपास 8,50,000 रुपये इतकी आहे आणि सोन्याच्या डिजाईनची किंमत तब्बल 30,820 डॉलर म्हणजेच जवळपास 21,88,000 रुपये आहे. तर हिरे जडीत iPhone 11 Pro ची किंमत सेन्याच्या आयफोनच्या दुप्पट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI