कॉलेज तरुणांसाठी खुशखबर, दुकाटीची स्वस्त बाईक भारतात लॉन्च

नवी दिल्ली : सुपरबाईक बनवणारी इटालियन प्रसिद्ध कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन बाईक लाँच केली आहे. स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे. या बाईकची (एक्स-शोरुम) किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. पिवळा आणि केसरी असे […]

कॉलेज तरुणांसाठी खुशखबर, दुकाटीची स्वस्त बाईक भारतात लॉन्च
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

नवी दिल्ली : सुपरबाईक बनवणारी इटालियन प्रसिद्ध कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन बाईक लाँच केली आहे. स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे. या बाईकची (एक्स-शोरुम) किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत.

दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. पिवळा आणि केसरी असे दोन रंग दिले आहेत. बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करत आहेत. नव्या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. प्रत्येक व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे.

या बाईकमध्ये 13 लीटरची फ्यूअल टॅक दिली आहे. तसेच 6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन दिले आहे. गाडीमध्ये एबीस सिस्टम असून 170 किलो वजनाची गाडी आहे.

महागड्या बाईकमध्ये नेहमी दुकाटी गाडीचे नाव घेतले जाते. दुकाटीच्या प्रत्येक बाईकची किंमत ही 15 लाखे ते 50 लाखांपर्यंत आहे. मात्र पहिल्यांदाच कंपनीने स्वस्त दरात बाईक लाँच केली आहे. भारतात कंपनीने स्क्रॅम्बलर ही बाईक लाँच केली असून या बाईकची किंमत 7 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत आहे.

दुकाटीच्या या नव्या बाईकची किंमत किती?

नवी दिल्ली – 8,48,427

मुंबई – 8,72,097

बंगळुरु – 9.11.547

कोलकत्ता – 8,25,117

पुणे – 8,72,097

अहमदाबाद – 8,64,207

इरनाकुलूम – 8,63,892

गुरगाव – 8,79,672

भारतातील प्रत्येक शहरात दुकाटीच्या या नव्या बाईकची किंमत वेगवेळी आहे. राज्यानुसार टॅक्स आणि इतर गोष्टींचा त्या किंमतीत समावेश केला जातो.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.