लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन, जाणून घ्या काय असेल खास

Facebook आणि Instagram लहान मुलांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करणार आहेत. हे अ‍ॅप सध्याच्या इन्स्टाग्रामची एक नवीन आवृत्ती (व्हर्जन) असेल.

लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन, जाणून घ्या काय असेल खास
आता इंस्टाग्रामवर रील्स एडिट करणे झाले सोपे
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 1:40 PM

नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) लहान मुलांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करणार आहेत. हे अ‍ॅप सध्याच्या इन्स्टाग्रामची एक नवीन आवृत्ती (व्हर्जन) असेल, विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अॅप असेल. इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी BuzzFeed ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामचे दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असेल. तर दुसरं व्हर्जन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. लहान मुलं या सेफ मोडमध्ये इन्स्टाग्रामचा वापर करु शकतील. (Facebook may soon launch Instagram for kids under the age of 13)

सध्याचे इंस्टाग्रामचे धोरण 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देत ​​नाही. तसेच, मुलं त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed च्या अहवालानुसार, किड्स फोक्स्ड Instagram व्हर्जनचे काम Instagram चे प्रमुख Adam Mosseri पाहतील. त्याचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष Pavni Diwanji करणार आहेत, त्यांनीच यापूर्वी युट्यूब किड्सचे नेतृत्व केले होते. हे Google च्या सब्सिडियरीचे चाइल्ड फोकस्ड प्रोडक्ट आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट असल्याचा आरोप आहे. यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढला होता. यूके आधारित नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू चिल्ड्रनच्या (National Society for the Prevention of Cruelty to Children) अहवालानुसार, इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित सर्वाधिक केसेस आढळले आहेत. गेल्या तीन वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स तयार करण्याचा दबाव वाढला आहे.

(Facebook may soon launch Instagram for kids under the age of 13)

'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.