AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवरील नंबर गेम संपणार, पोस्टवरील लाईक्स लवकरच बंद

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Like War) कुणाच्या पोस्टला जास्त लाईक मिळतात याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

फेसबुकवरील नंबर गेम संपणार, पोस्टवरील लाईक्स लवकरच बंद
| Updated on: Sep 27, 2019 | 6:05 PM
Share

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Like War) कुणाच्या पोस्टला जास्त लाईक्स मिळतात याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेकदा त्यातून इतरांचा द्वेष करणे अथवा आपल्याला लाईक्स मिळाले नाही म्हणून निराश होण्याचं प्रमाणही वाढत आहे. फेसबुकवर हे ‘लाईक वॉर’ (Facebook Like War) सर्वाधिक पाहायला मिळतं. या लाईक्सच्या नंबर-गेममध्ये (Facebook Number Game) अनेक युजर्स डिप्रेशनचेही शिकार (Depression due to Social Media) झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन फेसबुक आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टखाली दिसणाऱ्या लाइक्सची संख्या (Facebook Like count Option removal) हटवण्याचा विचार करत आहे.

फेसबुकने याबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे. याची प्रायोगिक सुरुवात 27 सप्टेंबर रोजी सर्वात आधी ऑस्ट्रेलियात होणार आहे. याची अंमलबजावणी झाल्यानंतर पोस्ट करणाऱ्याला लाईक आणि रिअॅक्शन काऊंट पाहता येईल, मात्र इतरांना हे दिसणार नाही. इतरांना केवळ म्यूचुअल फ्रेंडच्या नावासह रिअॅक्शन आयकॉन दिसतील. अशाप्रकारे इतर फेसबुक यूजर एकमेकांच्या पोस्टवरील लाईकची संख्या पाहू शकणार नाही. त्यामुळे लाईकची स्पर्धा कमी होण्यास मदत होणार आहे. व्हिडीओ व्यूव्हज दिसणार नाही

फेसबुकवरील पोस्टचाच नंबर गेम नाही, तर व्हिडीओच्या व्यूव्हजचा नंबर गेम देखील बंद होण्याची शक्यता आहे. पोस्ट करणाऱ्या व्यतिरिक्त इतर युजर्सला इतरांच्या लाईकसोबतच व्हिडीओचे व्यूव्हज देखील दिसणार नाहीत. फेसबुकने याबाबत म्हटले आहे, ‘फेसबुकवर लाईकची स्पर्धा किंवा युद्ध होऊ नये असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आम्ही एक प्रयोग करत आहोत. यातून युजर नवा फॉरमॅट कसा स्वीकारतात हे समजेल. यातून हा प्रयोग जागतिक पातळीवर लागू करता येईल का हेही आम्हाला समजेल अशी आशा आहे.’

नव्या बदलात लाईक आयकॉनवर टॅप केल्यावर कुणी संबंधित पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओला लाईक केलं हे पाहता येणार आहे. केवळ टाईमलाईन स्क्रॉल करताना लाईकची संख्या दिसणार नाही. फेसबुकवरील सुधारणांचं हे केवळ एक पाऊल आहे असं फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुकला सद्यस्थितीत आपल्या युजर्सवर पडणारा सामाजिक दबाव कमी करायचा आहे. लाईक आणि व्यूव्हजचं युद्ध थांबलं तर लोक अधिक मोकळेपणाने आपले विचार, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करु शकतील. सोशल साईटवर कमी लाईक मिळाले म्हणून ताण तणाव येणे, सायबर बुलिंग आणि आत्महत्येची अनेक प्रकरणे समोल आलेली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांवर या प्रयोगाने नियंत्रण येईल, अशी आशा फेसबुकला आहे.

इंस्टाग्रामवरही प्रयोग सुरू

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरही पोस्टवरील लाईक्स हटवण्याचा प्रयोग होत आहे. त्यासाठी एका प्रोटोटाईप डिझाईनवर कामही सुरू झालं आहे. इंस्टाग्रामवर संबंधित प्रोटोटाईप डिझाईन यूजर्सच्या पोस्टवरील लाईक हटवेल. ज्याने पोस्ट शेअर केली तो मात्र आपल्या पोस्टवर किती लाईक आल्या हे पाहू शकेल. सध्या इंस्टाग्रावरही ही सेवा सर्वांना उपलब्ध नाही. प्रायोगिक तत्वावरील या प्रोटोटाईपमध्ये पोस्टच्या जवळच ‘view likes’ या पर्यायाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पर्याय केवळ पोस्ट करणाऱ्याला उपलब्ध असेल.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.