AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Sale : Motorola च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट

मोटोरोलाने (Motorola) शुक्रवारी त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. (Flipkart Big Savings Days sale 2021)

Flipkart Sale : Motorola च्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:24 AM

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) त्यांच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी (flipkart big billion days 2021) आहे, हा सेल 2 मेपासून सुरू झाला आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या (Moto) टॉप स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये मोटो जी 40 फ्यूजन (Moto G40 Fusion) आणि मोटो जी 60 (Moto G60) या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. विक्री दरम्यान, ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सूट मिळेल. (Flipkart Big Savings Days sale : Big Discount on motorola phones including Moto Razr 5G)

मोटोरोलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनला उत्कृष्ट फीचर्ससह अपग्रेड करायला हवं. यात कॅमेरा सिस्टम, वेगवान प्रोसेसर, लाँग बॅटरी, स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आणि अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व फीचर्ससह, ग्राहक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन निवडू शकतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट सेलदरम्यान दिल्या जाणाऱ्या बेस्ट डील्स ग्राहकांनी मिस करु नये.

Razr 5G फोल्डेबल फोनवर 21 हजारांचा डिस्काऊंट

ग्राहक या सेलमध्ये फोल्डेबल फोन देखील स्वस्तात खरेदी करु शकतात. जो मोटो रेजर 5 जी या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये हा फोन 88,999 रुपये इतक्या किंमतीसह उपलब्ध आहे. आपण हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक ऑफरसह खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 1,09,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचं बेस मॉडेल 53,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत 74,999 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे.

G10 Power, E7 Power वर मोठा डिस्काऊंट

मोटोरोलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) हा स्मार्टफोन 8099 रुपयात खरेदी करू शकता. त्याच वेळी, मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) 6299 रुपयांमध्ये बँक ऑफरसह खरेदी करता येईल. मोटो जी 60 हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पण ही ऑफर ग्राहक जेव्हा एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहाराच्या सहाय्याने फोन खरेदी करतील तेव्हाच उपलब्ध असेल. तर जी 40 फ्यूजन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो, म्हणजेच 12,999 रुपये या किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

रियलमी, सॅसमंगच्या स्मार्टफोन्सवर सूट

फ्लिपकार्टच्या लेटेस्ट ऑनलाइन सेलमध्ये इतर स्मार्टफोन ब्रँडवरही बर्‍याच ऑफर्स मिळतील. म्हणजेच, आपण रियलमी नार्झो 30 ए हा स्मार्टफोन 7,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्याच वेळी, सॅमसंग गॅलेक्सी F62 ची प्रारंभिक किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर रियलमी C25 आणि रियलमी C21 9,499 आणि 7249 रुपयांच्या या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण डिजिटल कॅमेरे, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉचदेखील खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या

Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

(Flipkart Big Savings Days sale : Big Discount on motorola phones including Moto Razr 5G)

'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.