इंटरनेट न वापरता Google Maps असे काम करतो, अनेकांना माहीत नाही ही ट्रिक
Google Map Tricks: गूगलच्या या फिचरचा दुसरा फायदा तुम्हाला हव्या त्या जागी पोहचण्यासाठी प्रत्येकवेळी मॅपचे लोकेशन टाकण्याची गरज नाही. त्यासाठी एक ट्रिक वापरावी लागणार आहे. त्यामुळे गूगल मॅपवर तुमची नेहमीची लोकेशन सेव्ह करता येणार आहे.

Google Map Tricks: गूगल मॅप जगातील सर्वात वापर होणारा अॅप आहे. या अॅपमध्ये युजरसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. परंतु गूगल मॅप फोनवर चालवण्यासाठी इंटरनेटची गरज पडते. परंतु गूगलचा एका फिचरचा वापर केल्यावर तुम्हाला इंटरनेटशिवाय गूगल मॅप वापरता येणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी इंटरनेट नसेल, त्या ठिकाणी जाताना गूगल मॅप काम करणार आहे. या सुविधेमुळे अनेक युजरला ग्रामीण भागात जाताना येणारी अडचण दूर होणार आहे.
गूगलच्या या फिचरचा दुसरा फायदा तुम्हाला हव्या त्या जागी पोहचण्यासाठी प्रत्येकवेळी मॅपचे लोकेशन टाकण्याची गरज नाही. त्यासाठी एक ट्रिक वापरावी लागणार आहे. त्यामुळे गूगल मॅपवर तुमची नेहमीची लोकेशन सेव्ह करता येणार आहे. तसेच इंटरनेट नसताना किंवा इंटरनेटचा वेग कमी असतानाही तुम्ही मॅपचा वापर करु शकतात.




या पद्धतीने करा बदल
- सर्वप्रथम, तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Map ॲप उघडा. या टप्प्यावर, तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले आहे. Google मॅपमध्ये साइन इन केले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला जिथे जायचे आहे ते स्थान शोधा. यानंतर More वर टॅप करा. यानंतर ऑफलाइन नकाशा डाउनलोड करा. आता तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश केला आहे त्या ठिकाणी इंटरनेटशिवायही पोहोचू शकाल. लक्षात घ्या की इंटरनेटशिवाय तुम्हाला त्या रस्त्यावर कुठे आणि किती रहदारी आहे याची माहिती मिळणार नाही.
Google Maps वर लोकेशन सेव्ह करा
- तुमच्या Android आणि iPhone वर Google मॅप उघडा.
- तुम्हाला गुगल मॅपमध्ये सेव्ह करायचे असलेले लोकेशन ओपन करा.
- तुम्हाला लोकेशनच्या खाली सेव्ह बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता तुम्ही प्राइव्हेट, पसंदीदा, Want to Go, Travel Plan यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.
- या प्रकारे तुम्ही गुगल मॅपमध्ये लोकेशन सेव्ह करू शकता.