एकदा चार्जिंग करा, 75 किमी पळवा, ही स्कुटी खरेदी करण्यासाठी 18 हजारांचं अनुदान

मुंबई : इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Greaves Cotton ने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal लाँच केली. विशेष म्हणजे ही स्कुटी खरेदी करण्यासाठी 18 हजारांचं अनुदान मिळणार आहे. फेम-2 योजनेअंतर्गत या स्कुटीवर 18 हजार रुपयांचं अनुदान मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. त्यामुळे ही स्कुटी भारतीयांसाठी एक परवडणारा पर्याय ठरु शकते. अनुदानानंतर या स्कुटीची किंमत 66 हजार […]

एकदा चार्जिंग करा, 75 किमी पळवा, ही स्कुटी खरेदी करण्यासाठी 18 हजारांचं अनुदान
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 8:02 PM

मुंबई : इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Greaves Cotton ने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal लाँच केली. विशेष म्हणजे ही स्कुटी खरेदी करण्यासाठी 18 हजारांचं अनुदान मिळणार आहे. फेम-2 योजनेअंतर्गत या स्कुटीवर 18 हजार रुपयांचं अनुदान मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. त्यामुळे ही स्कुटी भारतीयांसाठी एक परवडणारा पर्याय ठरु शकते. अनुदानानंतर या स्कुटीची किंमत 66 हजार रुपये असेल.

Ampere Zeal ची टॉप स्पीड 55 किलोमीटर प्रती तास आहे. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटी 75 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या स्कुटीला फुल चार्ज करण्यासाठी साडे पाच तासांचा वेळ लागतो. या स्कुटीचे बॉडी ग्राफिक्स आणि एलईडी हेडलाईट्स याच्या लूकला आधिक आकर्षक बनवतात.

Ampere Zeal चे फीचर्स

Ampere Zeal इलेक्ट्रिक स्कुटीमध्ये ड्यूअल स्पीड मोड (इकॉनमी आणि पावर) देण्यात आले आहेत. यामध्ये पावरफूल एक्सलरेशन आहे. ही स्कुटी 14 सेकंदात 0 ते 50 किलोमीटर प्रती तासाचा वेग घेऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्कुटीमध्ये अॅण्टी थेफ्ट अलार्मही देण्यात आला आहे. ही स्कुटी पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Ampere Zeal या स्कुटीला Ampere Vehicle ने बनवलं आहे. ही Greaves Cotton ची सहाय्यक कंपनी आहे. या कंपनीच्या कमी स्पीड आणि कमी किमतीतील स्कुटीही उपलब्ध आहेत. Ampere Vehicle चे इलेक्ट्रिक व्हेहिकल्स हे तीन वर्षांच्या वॉरंटीसोबत येतात. या कंपनीचे देशात 300 पेक्षा अधिक Greaves रिटेल स्टोर्स आणि 5 हजारपेक्षा अधिक आऊटलेट आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.