WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही भन्नाट ट्रिक वापरा

ही भन्नाट ट्रिक वापरुन तुम्ही WhatsApp मधून डिलीट केले मेसेजेस वाचू शकता.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही भन्नाट ट्रिक वापरा
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 3:06 PM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp नेहमीच युजर्सच्या मागणीनुसार अपडेट होत असतं. कंपनी युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने नवनवे फिचर्स रोलआऊट करत असते. त्यामुळेच हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. युजर्सच्या मागणीनुसार नवनवीन फिचर्स देणाऱ्या WhatsApp ने काही वर्षांपूर्वी एक महत्त्वाचं फिचर आणलं जे सर्वांच्या पसंतीसही उतरलं. ते फिचर म्हणजे डिलीट फॉर एव्हरीवन (Delete for everyone). या फिचरद्वारे कोणताही युजर मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज डिलीट करु शकतो. (here is Trick you can use to read Whatsapp deleted message)

काही युजर्सना ना हे Delete for everyone फिचर आवडत नाही, तर काहींना असं वाटतं की कंपनीने हे फिचर अजून अपडेट करावं. डिलीट केलेला मेसेजही वाचता यावा, असं अपडेट कंपनीने आणावं, अशी मागणी केली जाते. कारण अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तो मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सुक असतो. परंतु WhatsApp मध्ये असं कोणतंही फिचर नाही, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकतो. किंवा त्यासाठी कोणतंही नवं फिचर रोलआऊट करण्याचा कंपनीचा मानस नाही. म्हणजे सध्या तरी कंपनी तसा विचार करत नाहीये.

डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सूक असतो, त्यात काय लिहिलं होतं, समोरच्या व्यक्तीने काय पाटवलं होतं, हे जाणून घेण्यासाठी आपण आतूर असतो परंतु आपल्याला तो मेसेज पाहता येत नाही. आम्ही मात्र तुमचा हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. कारण आम्ही तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठीची एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे डिलीट केलेले मेसेज तुम्ही मिळवू शकता.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावं लागेल. दरम्यान तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की, WhatsApp अशा कोणत्याही गोष्टीला प्रमोट करत नाही. तसेच या थर्ड पार्टी अ‍ॅपचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही या ट्रिकचा वापर करायला हवा.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज मिळवण्याची ट्रिक

1. डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागेल. 2. WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स अॅक्सेप्ट कराव्या लागतील. 3. अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल. 4. त्यानंतर तुम्ही असे अ‍ॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत. 5. यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा. तसेच तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचाही पर्याय दिसेल. तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता. 6. आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.

गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. परंतु हे अ‍ॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही अ‍ॅप उबलब्ध नाही.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?

1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

(here is Trick you can use to read Whatsapp deleted message)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.