वीजबिल ऑनलाइन पाहायचंय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा
आजच्या डिजिटल युगात वीजबिल तपासण्यासाठी तुमच्याकडे पर्यायांची कमतरता नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस कोणतीही हार्ड कॉपी येईपर्यंत थांबू नका फक्त थोडंसं नेट कनेक्शन असलं की, अशा पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर वीजबिल पाहून पेमेंट करून टाका.

तुम्ही जुन्या पद्धतीने वीजबिलाची वाट बघताय का? तर आता काळजी करू नका! डिजिटल युगात वीजबिल ऑनलाइन तपासणे अगदी सोप्पं आणि झटपट झालं आहे. तुम्हाला हार्डकॉपी, SMS किंवा ई-मेलद्वारे बिल मिळालं नसेल, तरी काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाईलवरच वीजबिल सहज पाहू शकता. या सुविधेसाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या वीज विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा Paytm, PhonePe, Google Pay, Amazon Pay यांसारख्या लोकप्रिय UPI अॅप्सचा वापर करू शकता.
आपण महाराष्ट्रातील वीजबिल ऑनलाइन तपासू इच्छित असाल, तर महावितरण (MSEDCL) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. याठिकाणी तुम्ही उपभोक्ता पोर्टलमधून तुमचं वीजबिल पाहू आणि भरू शकता.
step – by – step मार्गदर्शन:
1. सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये www.mahadiscom.in हे अधिकृत महावितरणची लिंक उघडा.
2. होम पेजवर “Consumer Portal” हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3. पुढील पेजवर “View & Pay Bills” असा पर्याय निवडा.
4. आता तुमचा विशिष्ट उपभोक्ता क्रमांक (याला BU क्रमांक देखील म्हणतात) भरावा लागेल. हा क्रमांक तुमच्या मागील वीजबिलावर असतो.
5. उपभोक्ता क्रमांक भरून “Submit” बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं चालू वीजबिल, एकूण रक्कम आणि इतर तपशील स्क्रीनवर दिसतील.
6. या पेजवरून तुम्ही तुमचं बिल पाहू शकता, त्याची प्रींट डाऊनलोड करू शकता किंवा थेट ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता.
UPI अॅप्सवरून वीजबिल कसे तपासाल? Paytm, Google Pay, Amazon Pay किंवा BHIM अॅपवरून देखील वीजबिल पाहता येते आणि पेमेंट करता येते. खाली दिलेले स्टेप्स जवळपास सर्व अॅप्ससाठी लागू होतात:
तुमचं आवडतं UPI अॅप ओपन करा.
‘Bill Payments’, ‘Electricity’ किंवा ‘Utilities’ या विभागावर क्लिक करा.
नंतर, तुमची वीज वितरण कंपनी निवडा (उदा. MSEB, Tata Power इ.).
आता तुमचा Consumer Number एंटर करा.
लगेचच तुमचं वीजबिल स्क्रीनवर येईल. हवं असल्यास तुम्ही इथूनच पेमेंट देखील करू शकता.
Consumer Number विसरलात? काळजी करू नका!
1. तुमचं जुने वीजबिल चेक करा त्यावर हा नंबर असतो.
2. वीजमीटरच्या जवळ एक ID स्टिकर लावलेली असते, त्यावरूनही माहिती मिळते.
3. किंवा, जवळच्या वीज वितरण कार्यालयात जाऊन माहिती मिळवता येते.
महाराष्ट्रसह इतर राज्यांसाठी लिंक
उत्तर प्रदेश: uppclonline.com
हरियाणा: dhbvn.org.in
पंजाब: pspcl.in
बिहार: nbpdcl.co.in / sbpdcl.co.in
मध्यप्रदेश: mpwz.co.in / mpez.co.in
छत्तीसगड: cspdcl.co.in
झारखंड: jbvnl.co.in
राजस्थान: energy.rajasthan.gov.in
पश्चिम बंगाल: wbseb.in
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
