AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7जीबी रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Infinix Smart 7 लाँच, किंमत आणि इतर फीचर्स जाणून घ्या

नुकताच इन्फिनिक्स कंपनीने आपला नवा कोरा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने 7 जीबी रॅम सपोर्ट करणारा इन्फिनिक्स स्मार्ट 7 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये 7 जीबीपर्यंत रॅम सपोर्ट करणाऱ्या या मोबाईलमध्ये या स्मार्टफोनची गणती होते.

7जीबी रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Infinix Smart 7 लाँच, किंमत आणि इतर फीचर्स जाणून घ्या
Infinix Smart 7 स्मार्टफोनची एकच चर्चा, 7जीबी रॅम आणि 6000mAh बॅटरी,किंमत फक्त इतकी
| Updated on: Feb 22, 2023 | 7:40 PM
Share

मुंबई : प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार स्मार्टफोनची निवड करत असतो. पण आपल्या बजेटमध्ये असलेल्या फोनमध्ये आवश्यक फीचर्स असतीलच असं नाही. त्यामुळे आपण आपल्या बजेटमध्ये असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतो. नुकताच इन्फिनिक्स कंपनीने आपला नवा कोरा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने 7 जीबी रॅम सपोर्ट करणारा इन्फिनिक्स स्मार्ट 7 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये 7 जीबीपर्यंत रॅम सपोर्ट करणाऱ्या या मोबाईलमध्ये या स्मार्टफोनची गणती होते. तसेच या स्मार्टफोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा स्मार्टफोन नुकताच लाँच झालेल्या पोको सी50, रेडमी ए1, टेक्नो पॉप 7 प्रो यांच्याशी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्सबाबत..

Infinix Smart 7 स्मार्टफोनची किंमत

कंपनीने या सेगमेंटमध्ये सिंगल व्हेरियंट स्मार्टफोन लाँच केला आहे.4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 7299 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 27 फेब्रुवारीपासून सुरु होईल.या स्मार्टफोन 4 जीबी रॅम असला तरी 3 जीबी रॅम वर्च्युअली सपोर्ट करू शकतो. म्हणजेच सात जीबीपर्यंत वाढवू शकतो. इन्फिनिक्स स्मार्ट 7 अँड्रॉईड 10 वर आधारित एक्सओएस 12 वर काम करतो.

Infinix Smart 7 स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 60 हर्ट्स रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. त्यामुळे 500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युनिसॉक एसी9863ए1 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी पॉवरव्हीआर जीपीयु दिलं आहे. स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे दिले आहेत. प्राथमिक कॅमेरा 13 एमपी आणि दुसरा कॅमेरा 2 एमपीचा आहे.तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी असून टाईप सी पोर्टच्या माध्यमातून 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.