64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह iQOO चा ढासू स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या दमदार फीचर्स

iQOO कंपनी अखेर भारतातील त्यांचा पुढील स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. IQOO Z5 हा फोन आज (27 सप्टेंबर) भारतीय बाजारात दाखल होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.

64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह iQOO चा ढासू स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या दमदार फीचर्स

मुंबई : iQOO कंपनी अखेर भारतातील त्यांचा पुढील स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. IQOO Z5 हा फोन आज (27 सप्टेंबर) भारतीय बाजारात दाखल होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. हे लाँचिंग काही वेळात सुरु होईल. कंपनीने केवळ या फोनच्या लॉन्चची तारीख उघड केली आहे, मात्र याचे फीचर्स किंवा किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स बद्दल थोडीफार माहिती समोर आली आहे. (iQoo Z5 5G to Launch in India Today at Noon: know Expected Price and features)

iQOO Z5 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह येईल. याशिवाय यात UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम असेल. यापूर्वी Weibo वर iQOO द्वारे शेअर केलेला फोटो डिव्हाइसचं पुढील पॅनेल दर्शवतो, या फोनच्या डिस्प्लेच्या मध्यभागी पंच-होल सेल्फी कॅमेरासह सर्व बाजूंनी अतिशय पातळ बेजल्स आहेत. व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण नवीन iQOO स्मार्टफोनच्या उजव्या कोपऱ्यात दिसू शकतात.

iQOO Z5 मध्ये Z3 च्या तुलनेत काही ऑडिओ सुधारणा पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह हाय रेस ऑडिओ वायरलेसला सपोर्ट करेल.

IQOO Z5 च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 120Hz रिफ्रेश रेटसह कर्व्ड फुल-एचडी+ डिस्प्ले समाविष्ट करण्याची अफवा आहे. 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह मागील बाजूस ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप असू शकतो. हे डिव्हाइस अँड्रॉइड 11 वर काम करते आणि 8 जीबी रॅमसह येऊ शकते. 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 5,000mAh बॅटरी देखील असू शकते.

कंपनी या फोनचे लो-बजेट व्हेरिएंट लॉन्च करू शकते, ज्याचे नाव iQOO Z5x असेल. स्मार्टफोन 120Hz ऐवजी 90Hz AMOLED डिस्प्ले आणि iQOO Z5 वर स्नॅपड्रॅगन चिपसेटच्या जागी MediaTek Dimensity 900 सह लाँच होऊ शकतो. याशिवाय, कंपनी येथे स्टेप-अप व्हेरिएंट देखील देऊ शकते, ज्यामध्ये उत्तम कॅमेरा आणि डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(iQoo Z5 5G to Launch in India Today at Noon: know Expected Price and features)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI