जिओचा हा प्लॅन होणार बंद, ‘या’ नवीन प्लॅनचा फायदा घेऊन तुम्हाला मिळेल 200 दिवसांची वैधता
रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्ससाठी एक आश्चर्यकारक प्लॅन लाँच केला होता जो 2150 रुपयांच्या फ्री बेनिफिटसह येतो. रिपोर्ट्सनुसार, या प्लॅनशी संबंधित ऑफर्स एकतर बंद केल्या जाऊ शकतात किंवा प्लॅनच बंद केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या जिओ ऑफरचा तुम्ही किती काळ फायदा घेऊ शकता.

देशातील सर्वात आघाडीवर असलेल्या टेलिकॉम कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या युजर्सासाठी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. काही रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त असतात तर काही रिचार्ज प्लॅनची किंमत प्रचंड असते. Reliance Jio ने नवीन वर्षात युजर्ससाठी धमाकेदार जिओ ऑफर लाँच केली होती, यात कंपनीकडून २१५० रुपयांचा प्लॅन ग्राहकांच्या सोयीसुविधा लक्षात घेता लाँच केला होता. मात्र रिपोर्ट्सनुसार ग्राहकांसाठी ही Jio Offer लवकरच संपणार आहे. पण कंपनीकडून या जिओ ऑफरचा फायदा युजर्सना 2025 रुपयांच्या प्लॅनसोबत दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही ऑफर कधी संपणार आहे आणि ती संपण्यापूर्वी तुम्ही या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता.
जिओ 2025 प्लॅन डिटेल्स
रिलायन्स जिओच्या 2025 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2.5 जीबी हायस्पीड डेटा, लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ची सुविधा देईल. रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लॅन 200 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच दररोज 2.5 जीबी हायस्पीड डेटावर हा प्लॅन तुम्हाला एकूण 500 जीबी हायस्पीड डेटा देण्यात येणार आहे.
या प्लॅनच्या एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर 2025 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा फ्री ॲक्सेस देण्यात येणार आहे. जिओच्या अधिकृत संकेतस्थळानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रीपेड युजर्सना या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5जी डेटाचा ही फायदा होणार आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, २०२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाच्या प्रीमियम सब्सक्रिप्शनचा लाभ समाविष्ट नाहीये.
जिओ ऑफर डिटेल्स
जिओ न्यू इयर ऑफर अंतर्गत जिओकडून २९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांच्या सवलतीचे कूपन मिळेल. याव्यतिरिक्त EaseMyTrip याद्वारे विमान तिकिटे बुक केल्यास तुम्हाला1500 रुपयांपर्यंत च्या सवलतीचा फायदा होईल.
इतकंच नाही तर स्विगीकडून 499 रुपयांच्या खरेदीवर 150 रुपयांच्या सवलतीचा ही फायदा होऊ शकतो. एकंदरीत 2025 रुपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला 2150 रुपयांचा फायदा मिळत आहे. रिपोर्टनुसार ग्राहकांना या ऑफरचा लाभ फक्त 31 जानेवारी 2025 पर्यंतच घेता येणार आहे.