AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओ हॉटस्टारच्या नवीन प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी पाहू शकता तुमच्या आवडते चित्रपट, जाणून घ्या ‘हे’ 3 स्वस्त प्लॅन

तुम्हाला तुमच्या आवडत्या मुव्हिज किंवा शो Jio Hotstar वर पहायचा आहे पण सबस्क्रिप्शन नाहीये? मग काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी Jio Hotstar OTT सह स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त OTTच नाही तर तुम्हाला हाय स्पीड डेटाचा फायदा देखील दिला जाईल. चला तर मग जाणून घेऊयात...

जिओ हॉटस्टारच्या नवीन प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी पाहू शकता तुमच्या आवडते चित्रपट, जाणून घ्या 'हे' 3 स्वस्त प्लॅन
jio hotstar
| Edited By: | Updated on: Sep 11, 2025 | 11:04 AM
Share

आजच्या स्मार्टयुगात प्रत्येकजण ऑनलाईन पद्धतीने काम करत आहे. तसेच हे ओटीटीचे युग म्हणता येईल. कारण लोकांना घरी बसून जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि ओरिजिनल शो पाहण्याला पसंती देत आहेत. परंतु अनेक लोकांना प्लॅनची ​​किंमत जास्त वाटते त्यामुळे ते सबस्क्रिप्शन खरेदी करत नाही. पण आता काळजी करण्याचे कारण नाही कारण जिओ कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी फक्त 100 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो तुम्हाला जिओ हॉटस्टारचा फायदा देईल, केवळ ओटीटी फायदेच नाही तर तुम्हाला 100 रुपयांमध्ये डेटा देखील दिला जाईल. चला तर आजच्या लेखात आपण अशाच काही टेलिकॉम कंपन्यामधील स्वस्त ओटीटी प्लॅनबद्दल जाणून घेऊयात…

एअरटेलचा 100 रूपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या 100 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ हॉटस्टारसोबत 5 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळेल. 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा फायदा मिळणार नाही कारण हा एक डेटा प्लॅन आहे.

जिओचा 100 रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटाचा फायदा देखील मिळतो, परंतु या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे 100 रुपये खर्च केल्यावर तुम्हाला 30 ऐवजी 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा फायदा मिळणार आहे, याचा अर्थ असा की तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीसारख्या कोणत्याही डिव्हाइसद्वारे 100 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी हॉटस्टार अॅक्सेस करू शकाल.

व्हीआयचा 151 रूपयांचा प्लॅन

एअरटेल आणि जिओची तुलना करता, व्होडाफोन आयडियाचा जिओ हॉटस्टार प्लॅन 50 रुपयांनी महाग आहे, परंतु VI प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेचा फायदा देतो. या प्लॅनमध्ये प्रीपेड वापरकर्त्याला 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा फायदा देण्यासोबतच 4 जीबी डेटाचा फायदा मिळतो.

हे लक्षात ठेवा

तुमच्या नंबरवर जर प्रायमरी प्लॅन आधीच सक्रिय असेल तरच तुम्ही Jio, Airtel, Vodafone Idea (Vi) कडून वर नमूद केलेल्या या OTT प्लॅनचे फायदे घेऊ शकाल. वर नमूद केलेल्या कोणत्याही डेटा प्लॅनसह तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळणार नाही.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.