AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

180 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावत असताना गाय अचानकमध्ये येते तेंव्हा काय होते पाहा… 

कोटा रेल्वे विभागाने अलीकडेच रेल्वेच्या वेगा बाबतीत एक नवीन इतिहास रचला आहे.

180 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावत असताना गाय अचानकमध्ये येते तेंव्हा काय होते पाहा... 
| Updated on: Dec 19, 2020 | 12:51 PM
Share

दिल्ली : राजस्थानमधील कोटा रेल्वे विभागाने अलीकडेच रेल्वेच्या वेगा बाबतीत एक नवीन इतिहास रचला आहे. गुरुवारी कोटा रेल्वे मंडळामध्ये 180 किलोमीटर वेगाने रेल्वेचे दोन डबे रुळावर धावले. 180 च्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेला गायीची धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे या घटनेनंतर कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र, या घटनेने रेल्वे चाचणीला धक्का बसला आहे. फक्त या घटनेला वगळता 180 च्या वेगाने रेल्वेचे परीक्षण यशस्वी झाले. (kota department has a history of running trains at a speed of 180 km per hour)

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे चाचणीसाठी प्रथम नागदा येथे रेल्वे नेण्यात आली. येथून रेल्वेला चाचणीसाठी पाठविण्यात आले. रामगंजमंडी ते मोड़क दरम्यान 180 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेला अचानक गायीची धडक झाली. यामुळे जवळपास 25 मिनिटे रेल्वे त्याचठिकाणी उभी राहिली. गाईंच्या धडकेत केटल गार्ड आणि इंजिनचे किरकोळ नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा गाडी 180 किमी वेगाने धावली. कोटा येथे रेल्वे आल्यानंतर चाचणी पूर्ण झाली. लबान स्टेशनपर्यंत या रेल्वेची चाचणी घेण्यात येणार होती.

यापूर्वी 2018 मध्ये वंदेभारत देखील 180 किमी वेगाने चालविण्यात आली होती. यापूर्वी 2018 मध्ये कोटा विभागातही वंदेभारत रेल्वे 180 किमी वेगाने चालवली गेली होती. या ट्रेनमध्ये स्वतंत्र इंजिन नव्हते. कोचच्या केवळ एका भागात इंजिन बसविण्यात आले होते. ती रेल्वे जास्तीत जास्त 200 किलोमीटर ताशी वेगाने धावण्यासाठी डिझाइन केली गेली होती. मात्र, स्वतंत्र इंजिनसह 180 किलोमीटर वेगाने रेल्वे चालवण्याची ही पहिलीच वेळ होती. या रेल्वेमध्ये इंजिन व्यतिरिक्त विशेष डिझाइनचे दोन डबे जोडलेले होते.

संबंधित बातम्या :

SBI ग्राहकांसाठी बँकेचा अलर्ट! KYC पडताळणीसाठी फोन किंवा मेसेज आला तर सावधान

27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?

(kota department has a history of running trains at a speed of 180 km per hour)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.