12 तास म्युझिक प्लेबॅक, 150 तासांच्या स्टँडबायसह जबरदस्त हेडफोन्स लाँच

12 तास म्युझिक प्लेबॅक, 150 तासांच्या स्टँडबायसह जबरदस्त हेडफोन्स लाँच

युजर्सना शानदार म्युझिक एक्सपिरियंस देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लुमिफोर्डने (Lumiford) वायरलेस हेडफोन सिरीज सादर केली आहे.

अक्षय चोरगे

|

Feb 16, 2021 | 6:38 PM

मुंबई : युजर्सना शानदार म्युझिक एक्सपिरियंस देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लुमिफोर्डने (Lumiford) वायरलेस हेडफोन HD50, HD60 आणि HD70 ची एक सिरीज सादर केली आहे. लेटेस्ट वायरलेस टेक्नोलॉजीद्वारे ऑपरेट होणारे हे डिवाइस 40 मिमी एचडी ट्रू-बास ड्रायवर्स आणि 20 हर्ट्ज ~ 20 किलोहर्ट्ज स्पीकर फ्रीक्वेंसी रिस्पॉन्ससह सादर करण्यात आले आहेत. (Lumiford launches power-packed Long Drive HD Series Wireless Headphone)

लेटेस्ट वायरलेस V5.0 कनेक्शनसह हे हेडफोन तीन वेरिएंट 10m ट्रांसमिशन रेंज प्रदान करतात. HD सिरीज 3.5 मिमी ऑक्स कनेक्शन, मायक्रो एसडी कार्ड, FM सपोर्ट, ब्लुटूथ आणि अनेक म्युझिक कनेक्टिविटी फीचरसह सादर करण्यात आले आहेत. हे हेडफोन रिचार्जेबल ली-पॉलीमर 400mAh बॅटरीद्वारे ऑपरेट होतात, जे केवळ 2.5 तासांच्या चार्जिंगनंतर 150 तासांचा स्टँडबाय टाईम आणि 12 तासांचा म्युझिक प्लेटाईम देतात.

या हेडफोन्सचं डिझाईनही दमदार आहे. हे हेडफोन्स वापरणाऱ्यांना आरामदायक अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटलं आहे. यामध्ये अल्ट्रा-सॉफ्ट कुशनसह HD50, HD60 आणि HD70 एक फोल्डेबल हेडफोन आणि अॅडजस्टेबल हेडबँड सपोर्ट देण्यात आला आहे. हे हेडफोन्स नॉइस कँन्सलेशन फीचरसह डिझाईन करण्यात आले आहेत. हे ओवर-ईयर हेडफोन तुमचा म्युझिक एक्सपिरियंस बदलतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

डुअल फोन कनेक्शन आणि इन-बिल्ट एचडी माइक्रोफोनसह तुम्ही जबरदस्त ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर करु शकता. नव्या हेडफोन्सच्या लाँचिंगबाबत बोलताना लुमिफोर्ड प्रायवेट लिमिटेड कंपनीचे CEO अभिजीत भट्टाचार्जी म्हणाले की, “आम्ही हे टॉप-ऑफ-द-लाइन ब्लुटूथ हेडफोन सादर करत असताना खूपच खूश आहोत. यामध्ये जबरदस्त लुक्स आणि टेक्नोलॉजीचा योग्य ताळमेळ साधला आहे. 40 मिमी एचडी ट्रू-बास ड्रायवर्स, फास्ट चार्जिंग, एफएम आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट तसेच ब्लॅक शेड्स युजर्सना आकर्षित करण्यासाठी हे फीचर्स पुरेसे आहेत.

लुमिफोर्ड लाँग ड्राइव्ह एचडी सिरीज ब्लुटूथ स्पीकर HD50, HD60 आणि HD70 च्या किंमती अनुक्रमे 2,599 रुपये, 2,999 रुपये और 3,699 रुपये इतक्या आहेत.

हेही वाचा

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज

आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर

Whatsapp चं देसी व्हर्जन Sandes अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध, जाणून घ्या काय आहे खास

(Lumiford launches power-packed Long Drive HD Series Wireless Headphone)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें