AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जवर 40 तासांचा बॅटरी बॅकअप, भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार Moto E40, कसा असेल नवा फोन?

लेनोवोच्या मालकीचा ब्रँड मोटोरोलाने गेल्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत Moto E40 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. हे डिव्हाईस उद्या (12 ऑक्टोबर) भारतात लॉन्च होणार आहे.

सिंगल चार्जवर 40 तासांचा बॅटरी बॅकअप, भारतात 'या' दिवशी लाँच होणार Moto E40, कसा असेल नवा फोन?
Moto E40
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई : लेनोवोच्या मालकीचा ब्रँड मोटोरोलाने गेल्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत Moto E40 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. हे डिव्हाईस उद्या (12 ऑक्टोबर) भारतात लॉन्च होणार आहे. Gizchina च्या अहवालानुसार, हे डिव्हाईस कार्बॉय ग्रे आणि पिंक क्ले रंगात लाँच होईल. कंपनीने नुकतीच या फोनच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. (Moto E40 Set to launch in india on 12 october, check price and feature)

स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, Moto E40 मध्ये एचडी+ रिझोल्यूशनसह 6.5-इंच एलसीडी स्क्रीन, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल डिझाइन देण्यात आले आहे.हा फोन ऑक्टा-कोर युनिसोक टी 700 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनची इंटर्नल स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

सॉफ्टवेअरबाबत बोलायचे झाल्यास, मोटो E40 Android 11 आउट ऑफ द बॉक्स वर चालतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 48 एमपी प्रायमरी सेंसर आहे, जो 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सरसह सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 एमपी फ्रंट कॅमेरादेखील आहे.

तगडा बॅटरी बॅकअप

हे डिव्हाइस 5,000 एमएएच बॅटरी बॅकअपसह येते जे यूएसबी टाईप-सी पोर्टद्वारे चार्ज केले जाते. ही बॅटरी 40 तासांचा बॅकअप देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. टीझर पोस्टरवर प्ले अँड वर्क लिहिलेले असले तरी, अशा परिस्थितीत, या फोनवर सलग 40 तास व्हिडीओ पाहता येईल की नाही, याबाबत शंका आहे. कंपनीचा दावा आहे की, 40 तास यावर गेमदेखील खेळता येईल. डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-सिम कार्ड सपोर्ट, 4G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक समाविष्ट आहे.

शानदार ट्रिपल कॅमेरा

या फोनच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. इतर दोन कॅमेऱ्यांमध्ये डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो सेन्सर आहेत.

इतर बातम्या

5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात

OnePlus च्या शानदार स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

2500 रुपयांहून कमी किंमतीत 4G फोन, लिस्टमध्ये नोकियासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध

(Moto E40 Set to launch in india on 12 october, check price and feature)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.