शानदार बॅटरी, 48MP कॅमेरासह Moto E40 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या डिटेल्स

लेनोवोच्या मालकीचा ब्रँड मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत Moto E40 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हे डिव्हाईस 12 ऑक्टोबर रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

1/5
लेनोवोच्या मालकीचा ब्रँड मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत Moto E40 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हे डिव्हाईस 12 ऑक्टोबर रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. Gizchina च्या अहवालानुसार, हे डिव्हाईस कार्बॉय ग्रे आणि पिंक क्ले रंगात लाँच होईल. फोनच्या लाँचिंगची घोषणा झालेली असली तरी कंपनीने अद्याप फोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

2/5
स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, Moto E40 मध्ये एचडी+ रिझोल्यूशनसह 6.5-इंच एलसीडी स्क्रीन, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल डिझाइन देण्यात आले आहे.

3/5
हा फोन ऑक्टा-कोर युनिसोक टी 700 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनची इंटर्नल स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

4/5
सॉफ्टवेअरबाबत बोलायचे झाल्यास, मोटो E40 Android 11 आउट ऑफ द बॉक्स वर चालतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 48 एमपी प्रायमरी सेंसर आहे, जो 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सरसह सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 एमपी फ्रंट कॅमेरादेखील आहे.

5/5
हे डिव्हाइस 5,000 एमएएच बॅटरी बॅकअपसह येते जे यूएसबी टाईप-सी पोर्टद्वारे चार्ज केले जाते. डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-सिम कार्ड सपोर्ट, 4G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक समाविष्ट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI