Realme GT Neo 3 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट लाँच, 17 मिनिटांत होईल पूर्ण चार्ज

रिअलमीने आपल्या दमदार स्मार्टफोनचे थॉर लव अँड थंडर एडिशन लाँच केली आहे. या फोनमध्ये 150W चार्जिंग आणि 12GB रॅम आहे.

Realme GT Neo 3 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट लाँच, 17 मिनिटांत होईल पूर्ण चार्ज
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 11:07 AM

मुंबई : रिअलमीने आपला एक स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन रिअलमी जीटी निओ 3 (Realme GT Neo 3) ची थॉर लव अँड थंडर एडिशन (Thor: Love And Thunder) आहे. हा एक स्पेशल एडिशन स्मार्टफोन असून यामध्ये ग्राहकांना थॉर लव अँड थंडरवर आधारित पिन आणि बॉक्समध्ये कार्ड मिळणार आहे. कंपनीने हा फोन भारतात फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. रिअलमी जीटी निओ 3 मध्ये देण्यात आलेले सेम फीचर्स या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) देखील देण्यात आलेले आहेत. हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 150W फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह हा फोन उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत आणि इतर फीचर्सबाबत या लेखातून जाणून घेणार आहोत.

काय आहे किंमत?

हा स्मार्टफोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ग्राहक त्याचा 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन नायट्रो ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. युजर्स 13 जुलैपासून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील. सध्या, तुम्ही रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टफोनची प्री-ऑर्डर करू शकता. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, प्रीपेड पेमेंटवर 3000 रुपयांची इंस्टंट सूट यावर मिळणार आहे.

कुठली फीचर्स मिळतील

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, याला Realme GT Neo 3 च्या व्हॅनिला व्हर्जन प्रमाणेच फीचर्स मिळतात. स्मार्टफोन 6.7 इंचाच्या AMOLED डिसप्लेसह येत असून तो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर देण्यात आला असून तो 12GB रॅमसह उपलब्ध आहे. यात 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दमदार बॅटरी

स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ती 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही 17 मिनिटांत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करू शकता. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, त्याची मुख्य लेंस 50MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित असून Realme UI 3.0 वर काम करतो.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.