AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Robots in the human brain : आता रोबोटही जाणार मेंदूत; आकार इतका लहान की इंजेक्शनद्वारे शरीरात जाणार, मानसिक आजारांवर होईल उपचार

मायक्रोरोबोट्सचा वापर कर्करोगाच्या गाठी, अपस्मार, पार्किन्सन्स रोग आणि मेंदूतील स्ट्रोकवर उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Robots in the human brain : आता रोबोटही जाणार मेंदूत; आकार इतका लहान की इंजेक्शनद्वारे शरीरात जाणार, मानसिक आजारांवर होईल उपचार
रोबोट्सImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 9:11 PM
Share

Robots in the human brain : सध्या धकाधकीच्या जीवनात मानसाचे आपलाच आपल्यावर ताबा राहिलेला नाही. या धावपळीच्या जगण्यात आपण काय खातोय, कसं जगतोय याहीकडं लक्ष द्यायला मानवाला आता वेळ नाही. तर सध्या शेतात रासायनिक खतांच्या भडीमारामुळे आपण अन्न कमी रासायनिक खतेच जास्त खात आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणार आजार होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. तर अनेक असे आजार आहेत की त्याचे निदान ही होताना दिसत नाही. त्यावर सध्या संशोधन केले जात आहेत. तर मानसाच्या अनेक आजारापैकी मानसिक आजार (mental illness) असा आहे, ज्याच्यावर इलाज होईल ही आणि नाहीही. त्यामुळे अवघे जग चिंतेत होते. पण आता यावरही उपाय मिळाला असून एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या (science fiction movies) कथेसारखी वाटावी अशी ही बाब आहे. मानसिक आजार बरे करण्यासाठी मानवी मेंदूमध्ये रोबोट्स (robots) पाठवण्यावर सध्या काम सुरू आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बायोनॉट लॅब्स ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन वर्षांत या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवांवर क्लिनिकल चाचण्याही केल्या जातील.

इंजेक्शनद्वारे रोबोट पाठवले जातील

मायक्रोरोबोट्स हे बुलेटसारखे लहान धातूचे सिलेंडर आहेत जे पूर्व-प्रोग्राम केलेल्या मार्गाचे अनुसरण करतात. बायोनॉट लॅबचे सीईओ मायकेल श्पिगेलमाकर यांच्या म्हणण्यानुसार, हे रोबोट्स इतके लहान आहेत की ते इंजेक्शनच्या मदतीने मानवी शरीरात टाकले जाऊ शकतात. हे नंतर चुंबकाच्या मदतीने मेंदूकडे निर्देशित केले जाऊ शकतात. तर मायकेल म्हणतात की, मायक्रोरोबोट्सचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 1966 मधील फॅन्टास्टिक व्हॉयेज चित्रपट, ज्यामध्ये शास्त्रज्ञांची एक टीम मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या दुरुस्त करण्यासाठी सूक्ष्म स्पेसशिपमध्ये प्रवास करते.

मायक्रोरोबोट कसे कार्य करतात?

बायोनॉट लॅब्सने जर्मनीच्या मॅक्स प्लँक संशोधन संस्थेच्या सहकार्याने रोबोट विकसित केले आहेत. रोबोट्सना मेंदूकडे पाठवण्यासाठी त्यांनी अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल ऊर्जेऐवजी चुंबकीय ऊर्जा वापरली, कारण त्यामुळे शरीराला इजा होत नाही. ही चुंबकीय कॉइल रुग्णाच्या डोक्यावर बसवून ती संगणकाशी जोडली गेली. त्याच्या मदतीने रोबोटला योग्य दिशेने हलवता येते आणि मेंदूचा प्रभावित भाग निश्चित करता येतो. हे पूर्ण उपकरण कोठेही सहजपणे नेले जाऊ शकते आणि ते MRI स्कॅनपेक्षा 10 ते 100 पट कमी वीज वापरते.

मायक्रोरोबोटमुळे मोठे आजार बरे होतील

न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, मायक्रोरोबोट्स डँडी-वॉकर सिंड्रोम बरा करण्यास सक्षम असतील. हा एक जन्मजात आजार आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये द्रव भरू लागतो आणि गोल्फ बॉलच्या आकारापर्यंतच्या सिस्ट्स देखील वाढू लागतात. त्यामुळे मेंदूवर दबाव वाढतो आणि मन आणि शरीराचा समतोल साधता येत नाही. मायक्रोरोबोट्सचा वापर कर्करोगाच्या गाठी, अपस्मार, पार्किन्सन्स रोग आणि मेंदूतील स्ट्रोकवर उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

प्राण्यांच्या चाचण्या

मायकेल सांगतात की, त्यांच्या कंपनीने हे तंत्रज्ञान मेंढ्या आणि डुकरांसारख्या मोठ्या प्राण्यांवर वापरले आहे. चाचणी परिणाम दर्शविते की तंत्रज्ञान मानवांसाठी देखील सुरक्षित आहे. Baynot Labs ला गेल्या वर्षी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मान्यता मिळाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.