पाऊस पडणार की पारा चढणार? आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अंदाज

मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम (युके) यांनी संयुक्तपणे या सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. (Now the super computer will predict the weather forecast)

पाऊस पडणार की पारा चढणार? आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अंदाज
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:42 PM

नवी दिल्ली : पाऊस असो वा उष्मा, हवामान खात्याने किती जरी अचूक अंदाज वर्तवले, तरी प्रत्यक्ष अनुभूती घेईपर्यंत त्यावर भरवसा न ठेवणारे अनेकजण आहेत. आता अशा लोकांपुढे लवकरच एक विश्वसनीय माध्यम म्हणून सुपर कम्प्युटर दाखल होणार आहे. हा कम्प्युटर जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर असेल व तो हवामानातील बदलांबाबत अत्यंत अचूक अंदाज वर्तवेल, असा दावा हा कम्प्युटर विकसित करणार्या संशोधकांनी केला आहे. मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम (युके) यांनी संयुक्तपणे या सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. (Now the super computer will predict the weather forecast)

2022 पासून काम सुरू होईल

ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धीपत्रकातून या सुपर कम्प्युटरची खूशखबर दिली आहे. हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कम्प्युटर सन 2022 पर्यंत कार्यरत होईल. हा सुपर कम्प्युटर बदलत्या आणि तीव्र हवामान परिस्थितीबद्दल अचूक अंदाज वर्तवेल. त्याचबरोबर वादळ, पूर आणि बर्फवृष्टीमुळे होणारी परिणामांपासून जिवीतहानी टाळण्यास मदत करेल.

ब्रिटनच्या हवामान खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेन्ने अँडरस्बी यांनी याबाबत सांगितले की, सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी मायकोसॉफ्ट आणि आम्ही एकत्र काम करत आहोत. यासाठी एकत्रितपणे हवामानाचे आतापर्यंतचे अंदाज आणि आकडेवारी संकलित करीत आहोत. त्याच अनुषंगाने सखोल अभ्यास करून सुपर कम्प्युटरच्या आधारे पुढील काळात हवामान बदलाबाबत अचूक भविष्यवाणी केली जाणार आहे. अशा प्रकारची भविष्यवाणी आणि अ‍ॅलर्टवरूनच लोकांना सुरक्षित राहून बाहेर न जाण्याचा इशारा देण्यात येईल.

सुपर कम्प्युटरच्या निर्मितीवर 12,400 कोटी खर्च येणार

सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी ब्रिटनचे सरकार तब्बल 12,400 कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी पुरवणार असल्याची घोषणा केली होती. हा सुपर कम्प्युटर जगभरातील आघाडीच्या 25 शक्तीशाली सुपर कम्प्युटरपैकी एक असेल, असा दावा केला जात आहे.

विमान सेवेलाही मदत होणार

प्रगत हवामान बदलांच्या मॉडेलिंगसाठीदेखील या कम्प्युटर डिव्हाइसचा वापर केला जाणार आहे. हा सुपर कम्प्युटर हवाई वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या हवा आणि तापमानाच्या परिस्थितीबाबतही अचूक अंदाज वर्तवणार आहे. या सुपर कम्प्युटरच्या मदतीने वादळ, अतिवृष्टी आणि पूर टाळण्यासाठी आपत्कालीन तयारी करण्यास मोठी मदत होईल, असे सांगण्यात येत आहे. हवामानाच्या पूवार्नुमानासाठी प्रथमच सुपर कम्प्युटर वापरला जात आहे, असे नाही. जपानमध्ये आधीपासूनच असा कम्प्युटर आहे. या कम्प्युटरचे नाव ‘फुगाकू’ असून त्सुनामीमुळे येणार्या पुराच्या भविष्यवाणीसाठी या कम्प्युटरचा वापर केला जात आहे. (Now the super computer will predict the weather forecast)

इतर बातम्या

PHOTO | फुटबॉलच्या मैदानातून प्रेमाची सुरुवात, साडे 3 वर्ष रिलेशन, नंतर लग्न, क्रिकेटपटू नितीश राणाची लव्ह स्टोरी

Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा एकदा स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.