AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone आणि आयपॅड हॅकर्सच्या निशाण्यावर, Appleकडून अलर्ट, युजर्सनं काय काळजी घ्यावी? जाणून घ्या…

अ‍ॅपलच्या म्हणण्यानुसार, बगचा फायदा घेऊन हॅकर्स आयफोन किंवा आयपॅडवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता येतं. अ‍ॅपलच्या मते या बगच्या मदतीने हॅकर्स वेब ब्राउझरद्वारे तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात.

iPhone आणि आयपॅड हॅकर्सच्या निशाण्यावर, Appleकडून अलर्ट, युजर्सनं काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...
iPhone आणि आयपॅड हॅकर्सच्या निशाण्यावरImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 20, 2022 | 6:01 AM
Share

नवी दिल्ली : खुद्द अ‍ॅपलने (Apple) आपल्या अनेक उत्पादनांबाबत इशारा दिला आहे. आयफोनने (iPhone) म्हटले आहे की त्याचे आयफोन, आयपॅड आणि मॅक हॅक झाले आहेत. अ‍ॅपलने म्हटले आहे की त्यांच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक बग आहे ज्याचा फायदा हॅकर्स (Hackers) घेऊ शकतात. अ‍ॅपलने आपल्या यूजर्सना तात्काळ आपत्कालीन अपडेट अपडेट करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन अपडेटसह बग फिक्स करण्यात आला आहे. बग दूर करण्यासाठी नवीन अपडेट लवकरच येत आहे. या बगमुळे iPhone 6S मॉडेल, iPad 5वी जनरेशन आणि वरील, iPad Air 2 आणि वरील, iPad mini 4 आणि वरील, सर्व iPad Pro मॉडेल्स, 7th जनरेशन iPod touch प्रभावित झाले आहेत. त्यामुळे आता युजर्सला लवकरात लवकर या गोष्टी अपडेट कराव्या लागतील.

कुठे धोका?

अ‍ॅपलचे म्हणणे आहे की या बगचा फायदा घेऊन हॅकर्स आयफोन किंवा आयपॅडवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात. अ‍ॅपलच्या मते या बगच्या मदतीने हॅकर्स वेब ब्राउझरद्वारे तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात. या बगच्या मदतीने मॅक कॉम्प्युटरही सहज हॅक केले जाऊ शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने आयफोन वापरकर्त्यांसाठी इशारा दिला होता. अलर्टमध्ये म्हटले आहे की iOS 15.5 असलेल्या आयफोन वापरकर्त्यांना जास्त धोका आहे. या बगचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सच्या फोनमध्ये घुसू शकतात.

हायलाईट्स

  1. यूजर्सना फोन तात्काळ आपत्कालीन अपडेट करण्यास सांगितले
  2. नवीन अपडेटसह बग फिक्स करण्यात आला आहे.
  3. बग दूर करण्यासाठी नवीन अपडेट लवकरच येत आहे.
  4. या बगमुळे iPhone 6S मॉडेल, iPad 5वी जनरेशन प्रभावित
  5. iPad Air 2, iPad mini 4, सर्व iPad Pro मॉडेल्स प्रभावित
  6.  7th जनरेशन iPod touch प्रभावित झाले आहेत.
  7. आता युजर्सला लवकरात लवकर या गोष्टी अपडेट कराव्या लागतील.

बगचा परिणाम

आयओएस आणि आयपॅडओएसवर नवीन बगचा परिणाम झाल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. हा बग AppleAVD, WebKit, libxmI2 आणि कर्नल ग्राफिक्स कंट्रोल, WebKit, IOMobileFrameBuffer, IOSurfaceAccelerator, Kernel, Wi-Fi आणि GPU ड्रायव्हर्समध्ये उपस्थित होता. या बगमुळे अ‍ॅपलचा सफारी ब्राउझरही हॅकर्सच्या निशाण्यावर होता. अ‍ॅपलचे म्हणणे आहे की या बगचा फायदा घेऊन हॅकर्स आयफोन किंवा आयपॅडवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात. अ‍ॅपलच्या मते या बगच्या मदतीने हॅकर्स वेब ब्राउझरद्वारे तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात. या बगच्या मदतीने मॅक कॉम्प्युटरही सहज हॅक केले जाऊ शकतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल