OnePlus 9RT लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus 9RT price in india : OnePlus 9RT चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, पण आता भारतात या स्मार्टफोनची किंमत उघड झाली आहे. ही किंमत 40-44 हजार रुपयांच्या दरम्यान असेल.

OnePlus 9RT लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oneplus 9rt

OnePlus 9RT price in india : OnePlus 9RT चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, पण आता भारतात या स्मार्टफोनची किंमत उघड झाली आहे. ही किंमत 40-44 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. ट्विटर प्लॅटफॉर्मवरील एका टिपस्टरने याचा खुलासा केला आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लसने नुकतेच स्वदेशात वनप्लस 9 आरटी लाँच केला आहे, तर भारतासह जगातील इतर देशांमध्ये हा फोन अद्याप लॉन्च होणे बाकी आहे. (OnePlus 9RT price in india leaked ahead of launch)

वनप्लस 9 आरटी चीनमध्ये 12 ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याच्या स्पेसिफिकेशनबाबतची अधिकृत माहिती देखील देण्यात आली आहे. टिप्स्टर योगेश ब्रार यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर दावा केला आहे की, भारतात वनप्लस 9 आरटी ची किंमत 40-44 हजार रुपये असेल. तथापि, कंपनीने अद्याप माहितीची पुष्टी केलेली नाही. दरम्यान आपण OnePlus 9RT चे फीचर्स जाणून घेऊया.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT चीनमध्ये लाँच झाला आहे. ज्यामध्ये 6.62-इंचांचा ई 4 एमोलेड डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवला आहे.

OnePlus 9RT चा प्रोसेसर आणि रॅम

वनप्लस 9 आरटीच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. तसेच, यात 256 GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन 19067.44 MM2 स्पेस कूलिंग सिस्टमसह येतो, जो गेमिंग दरम्यान स्मार्टफोन थंड ठेवतो.

OnePlus 9RT चा कॅमरा सेटअप

OnePlus 9RT च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX766 चा सेन्सर आहे, ज्यामध्ये बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल f / 1.8 अपर्चर आहे, त्यामध्ये 6P लेन्स देण्यात आली आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन दोन्हीचे वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 123 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तसेच, यात 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 9RT ची बॅटरी

OnePlus 9RT मध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 65 टी Wrap चार्जिंगसह येते. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ColorOS 12 वर सादर करण्यात आला आहे, परंतु इतर देशांमध्ये तो OxygenOS 12 सह लाँच होऊ शकतो. मात्र, भारतात लॉन्च झालेल्या वनप्लस 9 आरटी चे सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच असतील की त्यात काही बदल होतील हे अजून कळलेले नाही.

इतर बातम्या

बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर

‘या’ स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा मिळणार, 2021 मध्ये हे टॉप कॅमेरा फोन घरी आणा

(OnePlus 9RT price in india leaked ahead of launch)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI