बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

OnePlus 9RT आज चीनमध्ये लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. लेटेस्ट वनप्लस लॉन्च इव्हेंट स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता (IST संध्याकाळी 5:30 वाजता) होईल.

बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
OnePlus 9RT
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 5:52 PM

मुंबई : OnePlus 9RT आज चीनमध्ये लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. लेटेस्ट वनप्लस लॉन्च इव्हेंट स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता होईल. वनप्लस 9 आरटी लॉन्च इव्हेंट वनप्लस ची चायना वेबसाइट आणि वीबो अकाउंट द्वारे लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. हेच डिव्हाईस काही आठवड्यांत भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. पण ब्रँडने OnePlus 9RT चे काही महत्त्वाचे फीचर्स सादर केले आहेत. (OnePlus 9RT launching today, check expected features and price, know everything here)

वनप्लसने खुलासा केला आहे की, त्यांचा लेटेस्ट फोन क्वालकॉमच्या दमदार स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. हाच चिपसेट सध्या वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रोला पॉवर देत आहे. कंपनीने एका टीझरद्वारे आधीच पुष्टी केली आहे की, हे डिव्हाईस 5 डायमेन्शनल हीट डिस्सीपेशन डिझाइनसह येईल. हा फोन 7GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करेल. दरम्यान, या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपये असू शकते, कंपनीने याबद्दल अद्याप पुष्टी केलेली नसली तरी काही अहवालांमध्ये या फोनच्या किंमतीबाबत माहिती समोर आली आहे. अलीकडेच या आगामी फोनचे फीचर्स लीक झाले आहेत.

वनप्लस कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत नवीन सिरीज सादर करते आणि वर्षाच्या चौथ्या तिमाहीत त्या सिरीजसोबत टी जोडून नवी सिरीज सादर केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने वनप्लस 9 सिरीज सादर केली, ज्यामध्ये बेस मॉडेल वनप्लस 9 आर होते आणि त्यामुळे कंपनी आता वनप्लस 9 आरटी देखील लॉन्च करत आहे. यासोबत अजून किती मॉडेल्स लाँच केले जातील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी तुम्ही जर नवीन अफवांवर विश्वास ठेवलात तर वनप्लसच्या या आगामी फोनची किंमत CNY 2000 (23,000 रुपये) असेल, जी या फोनच्या बेस मॉडेलची किंमत आहे. तर या फोनच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत CNY 3000 (35000 रुपये) असू शकते.

संभाव्य फीचर्स

OnePlus 9RT च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च केलेल्या OnePlus 9R सारखाच असेल. नवीन लीक्समध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी Weibo चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात OnePlus 9RT चे फीचर्स उघड केले आहेत. OnePlus 9RT ची किंमत 34,000 रुपये असू शकते. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,000 रुपये इतकी असेल. याशिवाय जर तुम्ही 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट घेत असाल तर तुम्हाला 44,000 रुपये मोजावे लागू शकतात.

या फोनच्या नावानुसार, ही वनप्लस 9 आर ची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल जी वनप्लस 9 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर OnePlus 9RT ला OnePlus 9R सारखे 120Hz AMOLED पॅनल मिळेल. यात 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि यासोबत 4500mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त, त्याला स्नॅपड्रॅगन 870 ची हायर-बिन्ड आवृत्ती मिळेल. दुसरीकडे, जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर या फोनला वनप्लस नॉर्ड 2 प्रमाणे 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 सेन्सर मिळेल.

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा पहिला वनप्लस फोन असेल जो Android 12 ऑउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड OxygenOS 12 वर चालेल. हे ColorOS अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आणेल. OxygenOS 12 मध्ये गुगलचा नवीन मटेरियल यू एस्थेटिंक मिळेल. यासह, अहवालात असेही म्हटले गेले आहे की, कंपनी ऑक्सिजन ओएस 12 ची बीटा आवृत्ती लॉन्च करण्याची योजना आखत होती, परंतु अनेक बग्समुळे त्याचे लाँचिंग थांबवण्यात आले. कंपनीची सॉफ्टवेअर टीम या बगचे निराकरण करण्याचे काम करत आहे. तथापि, वनप्लस 9 आरटी किंवा ऑक्सिजन ओएस 12 च्या क्लोज्ड बीटा वर्जनबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

एकाच आठवड्यात फेसबुक, इंस्टाग्राम दुसऱ्यांदा डाऊन, कंपनीकडून दिलगिरी

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

(OnePlus 9RT launching today, check expected features and price, know everything here)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.