AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्लस घेऊन येत आहे एक उत्कृष्ट स्मार्टफोन, जो फ्लॅगशिप प्रोसेसर आणि पॉवरफूल बॅटरीने आहे सुसज्ज

नवीन OnePlus 15s लवकरच वनप्लस 15 सिरीजमध्ये सामील होऊ शकतो. अहवालानुसार हा स्मार्टफोन भारतात मे किंवा जून 2026 च्या सुमारास लाँच होऊ शकतो. कंपनी याला OnePlus 15 आणि OnePlus 15R यांच्यातील एक संतुलित पर्याय म्हणून सादर करत आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि पॉवरफूल फिचर्स जाणून घेऊयात.

वनप्लस घेऊन येत आहे एक उत्कृष्ट स्मार्टफोन, जो फ्लॅगशिप प्रोसेसर आणि पॉवरफूल बॅटरीने आहे सुसज्ज
oneplus nordImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 14, 2026 | 12:38 PM
Share

वनप्लस पुन्हा एकदा भारतीय स्मार्टफोन बाजारात धमाकेदार एँट्री घेण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन, OnePlus 15s लाँच करण्याची शक्यता आहे, जो परफॉर्मन्स आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत प्रीमियम सेगमेंटला लक्ष्य करेल. हा फोन OnePlus 15 आणि OnePlus 15R यांच्या दरम्यान ठेवला जाऊ शकतो. लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार OnePlus 15s मध्ये एक पॉवरफूल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि मोठी बॅटरी असू शकते. जर ही माहिती अचूक ठरली, तर हे डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी एक ऑल-राउंडर पर्याय बनू शकते. चला तर मग हा फोन भारतीय बाजारात कधी लाँच होईल तसेच फिचर्स देखील जाणून घेऊयात.

भारतात OnePlus 15s केव्हा लाँच केला जाईल?

अहवालानुसार OnePlus 15s मे किंवा जून 2026 च्या सुमारास लाँच होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की, हे डिव्हाइस चीनमध्ये लाँच झालेल्या OnePlus 15T चेच एक रिब्रँडेड व्हर्जन असू शकते. याच्या आधारावर त्याच्या किंमतीचा अंदाज लावला जात आहे. भारतात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 60 हजार रूपये असू शकते. ही किंमतीच्या रेंजमध्ये या फोनला प्रीमियम सेगमेंटमध्ये स्थान देता येईल. त्यामुळे परफॉर्मन्स आणि कॅमेरा यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करेल. मात्र कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

OnePlus 15s मध्ये एक पॉवरफूल कॅमेरा सेटअप मिळेल

लीक झालेल्या माहितीनुसार OnePlus 15s मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा 3.5x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल.

यावरून कंपनीचे कॅमेऱ्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. परफॉर्मन्ससाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि ॲड्रेनो 840 जीपीयू असण्याची शक्यता आहे. हे कॉम्बिनेशन गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी पुरेसे पॉवरफूल असून वापरकर्त्यांना एक सुरळीत अनुभव देईल असे म्हटले जातेय.

डिस्प्ले आणि बॅटरी फ्लॅगशिपचा अनुभव देखील उत्तम मिळेल

OnePlus 15s मध्ये 165Hz रिफ्रेश रेट आणि 1800 nits पीक ब्राइटनेस असलेला 6.32-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या वैशिष्ट्यांमुळे एक दमदार व्हिज्युअल अनुभव मिळतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास यात 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी 7500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. यामुळे वापरकर्त्यांना दीर्घकाळ टिकणारा बॅकअप आणि फास्ट चार्जिंग मिळू शकेल. तथापि फ्रंट कॅमेऱ्याबद्दलची माहिती सध्या सांगण्यात आलेली नाहीये. त्यामुळे वापरकर्त फोनच्या आधिकारिक घोषणाची वाट पाहत आहे.

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...