7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह ओप्पोचा हा फोन लाँच, जो Oneplus Nord 6 शी करेल स्पर्धा
ओप्पोचा 5जी स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. यामध्ये मोठी बॅटरी, प्रभावी कॅमेरा आणि 120 हर्ट्झ डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स व उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.

चीनी स्मार्टफोन ब्रँड ओप्पो कंपनीने भारतात त्यांचा नवीन एफ-सिरीज स्मार्टफोन Oppo F33 Pro 5G लाँच केला आहे. हा फोन पॉवरफूल बॅटरी आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतो. या फोनमध्ये मोठी 7000mAh बॅटरी, 50-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि उत्तम मीडियाटेक प्रोसेसर आहे. कंपनीने हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे, जिथे ओप्पोचा हा फोन वनप्लस नॉर्ड 6 सारख्या फोनशी स्पर्धा करेल. चला तर मग या फोनची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
किंमत आणि उपलब्धता
Oppo F33 Pro 5G भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 37 हजार 999 रूपये आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 40 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. कंपनी हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि तिच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरद्वारे विकणार आहे. हा फोन मिस्ट्री फॉरेस्ट, पॅशन रेड आणि स्टारी ब्लू यांसारख्या आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo F33 Pro 5G वैशिष्ट्ये
Oppo F33 Pro 5G मध्ये 6.57-इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले असून, तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
हा फोन Android 16 वर आधारित असलेल्या ColorOS 16 वर चालतो. परफॉर्मन्ससाठी यात 6nm तंत्रज्ञानाने बनवलेला MediaTek Dimensity 6360 MAX प्रोसेसर आहे. यासोबत Mali G57 GPU, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. या फोनमध्ये VC कूलिंग सिस्टीम देखील आहे.
बॅटरी, कॅमेरा आणि इतर वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 7000mAh बॅटरी, जी 80W सुपरVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे जलद चार्जिंग शक्य होते. कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून त्यासोबत 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 5, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे.
