5000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह 8 हजारांच्या रेंजमध्ये Poco चा दमदार स्मार्टफोन लाँच

Poco ने भारतात अगदी स्वस्तात मस्त असा Poco C31 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. नुकत्याच एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान या फोनचे लाँचिंग करण्यात आले आहे.

5000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह 8 हजारांच्या रेंजमध्ये Poco चा दमदार स्मार्टफोन लाँच
पोकोने फक्त 8,499 रुपयांमध्ये लॉन्च केला हा मस्त स्मार्टफोन

मुंबई : Poco ने भारतात अगदी स्वस्तात मस्त असा Poco C31 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. नुकत्याच एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान या फोनचे लाँचिंग करण्यात आले आहे. या फोनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फिचर्स आहे. यात 5000mAh बॅटरी, MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध होणार आहे. (Poco C31 to Launched in India, check price and specs)

भारतात Poco C31 या स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन लाँच केल्यापासून दोन्ही प्रकार 500 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी केले जाऊ शकतात. Poco चा हा फोन जर तुम्ही अॅक्सिस बँक किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून खरेदी केला तर तुम्हाला या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जाईल. तर फ्लिपकार्टवर 2 ऑक्टोबरपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा भाग असेल.

Poco C31 या फोनचा डिस्प्ले 6.53-इंच HD+ डिस्प्ले 20:9 aspect रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी TUV Rheinland रिडींग मोड देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करतो. या फोनचे इंटर्नल स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक हा पर्यायही देण्यात आला आहे.

या फोनमध्ये तीन कॅमेरा आहेत. यातील पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. हा स्मार्टफोनमध्ये रॉयल ब्लू आणि शॅडो ग्रे या दोन कलर टोनमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Poco C31 to Launched in India, check price and specs)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI