रिव्हर्स चार्जिंग, 16GB पर्यंत रॅम! लाँच झाला ‘हा’ स्वस्त 5G फोन, जाणून घ्या किंमत
15 हजारापेक्षा कमी किमतीत Pocoच्या या फोनने जोरदार एन्ट्री घेतली आहे. बजेट सेगमेंटमध्ये लाँच झालेला हा स्वस्त 5G फोन अनेक उत्कृष्ट फिचर्ससह सुसज्ज आहे. जर तुम्ही देखील या किमतीच्या रेंजमध्ये नवीन फोन शोधत असाल, तर या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या फिचर्सबद्दल, फोनची किंमत आणि विक्री तारखेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

भारतीय बाजार पेठेत Poco C85 5G लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या सी सीरीजमधील हा नवीन फोन एचडी+ रिझोल्यूशन, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, मीडियाटेक प्रोसेसर आणि 6000 एमएएच बॅटरीने परिपूर्ण आहे. यात वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारख्या फिचर्ससह येतो. कंपनीचा हा फोन दोन अँड्रॉइड अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे. चला जाणून घेऊया किंमत, विक्री कधी सुरू होईल आणि या फोनमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध असतील.
Poco C85 5Gची भारतातील किंमत
पोकोच्या या नवीन बजेट फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर 6 जीबी/ 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रूपये आणि 8 जीबी/128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपयांमध्ये फोन उपलब्ध आहेत. बँक ऑफर्समुळे तुम्ही या फोनवर 1000 रुपये वाचवू शकता. या किमतीच्या रेंजमध्ये हा फोन MOTOROLA g57 power 5G, POCO M7 Pro 5G, realme P3x 5G आणि REDMI Note 14 SE 5G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देणार आहे.
Poco C85 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा एचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे, जो 810 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हेडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि क्यूव्हीजीए सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
रॅम: 8 जीबी पर्यंत रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे, म्हणजेच तुम्हाला या बजेट फोनवर 16 जीबी पर्यंत रॅमचा फायदा मिळेल.
बॅटरी: हा फोन 6000 एमएएच बॅटरीने चालतो, हा हँडसेट 10 वॅट रिव्हर्स चार्जिंग आणि 33 वॅट फास्ट चार्जिंग सारख्या फिचर्स सह लाँच करण्यात आला आहे.
