AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किमती सारख्याच‍ पण Jio प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतील Vi प्लॅनपेक्षा जास्त डेटा, जाणून घ्या हा आकर्षक प्लॅन

रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला व्हीआय प्लॅनपेक्षा जास्त डेटाचे फायदे मिळतील. जर तुम्ही जिओ आणि व्होडाफोन आयडिया या दोन्ही कंपन्यांचे सिम कार्ड वापरत असाल, तर रिचार्ज करण्यापूर्वी या दोन प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

किमती सारख्याच‍ पण Jio प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतील Vi प्लॅनपेक्षा जास्त डेटा, जाणून घ्या हा आकर्षक प्लॅन
| Edited By: | Updated on: Jun 19, 2026 | 3:45 PM
Share

तुम्ही सुद्धा रिलायन्स जिओ किंवा व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड सिम एकत्र वापर आहेत का? आणि त्यात दोन्ही सिममध्ये 3 हजार 599 रुपयांचा रिचार्ज करत असाल तर थांबा, कारण रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्यासाठी कोणत्या कंपनीचा प्लॅन सर्वोत्तम आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. दोन्ही प्लॅनची ​​वैधता सारखीच आहे, परंतु जिओ आणि व्हीआयच्या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि अतिरिक्त लाभांमध्ये फरक दिसून येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण जिओचा आणि व्होडाफोन आयडियाचा प्लॅन यामध्ये कोणता प्लॅन वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात.

जिओ 3 हजार 599 रूपयांच्या प्लॅनची माहिती

3 हजार 599 रूपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅन ज्याची वैधता 365 दिवसांची आहे. या रिचार्जवर तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये एकूण 912.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसोबत 3 महिन्यांचे जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज, 18 महिन्यांचे गूगल जेमिनी प्रो सबस्क्रिप्शन, 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना बेनिफिट यांसारखे काही अतिरिक्त फायदेही मिळतात. या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळतो. या प्लॅनबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये कोणत्याही एफयूपी मर्यादेशिवाय (FUP limit) 5जी डेटा मिळतो.

व्हीआयच्या 3 हजार 599 रूपयांच्या प्लॅनची माहिती

व्होडाफोन आयडियाच्या 3 हजार 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा देते, तर जिओ दररोज 2.5 जीबी डेटा देते. या प्लॅनमध्ये एकूण 730 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये रात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाचा अनलिमिटेड डेटा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि ‘डेटा डिलाइट’ अंतर्गत दरमहा 2 जीबीपर्यंतचा बॅकअप डेटा मिळतो, ज्याचा दावा तुम्ही ‘Vi’ ॲपद्वारे करू शकता.

दोन्ही रिचार्ज प्लॅनमधील फरक: जिओच्या प्लॅनमध्ये 3 हजार 599 रुपयांमध्ये 182.5 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. तुम्हाला अतिरिक्त लाभांमध्येही फरक मिळेल, त्यामुळे तुमच्यासाठी कोणता प्लॅन चांगला आहे हे ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला