AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

125W फास्ट चार्जिंग आणि 898 चिपसेटसह Realme नवा स्मार्टफोन लाँच करणार

Realme GT 2 Pro मजबूत स्पेसिफिकेशन आणि अनेक दमदार फीचर्ससह लाँच होईल. या स्मार्टफोनमध्ये 125W फास्ट चार्जर आणि स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

125W फास्ट चार्जिंग आणि 898 चिपसेटसह Realme नवा स्मार्टफोन लाँच करणार
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 9:41 PM
Share

मुंबई : Realme GT 2 Pro मजबूत स्पेसिफिकेशन आणि अनेक दमदार फीचर्ससह लाँच होईल. या स्मार्टफोनमध्ये 125W फास्ट चार्जर आणि स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. चीनी कंपनीचा हा फोन Android 12 आधारित Realme UI 3.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. दरम्यान, हा फोन लाँच होण्यापूर्वी एका Tipster ने या फोनच्या कॅमेरा, चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. (Realme GT 2 Pro price and specifications leaked before launch)

Realme GT 2 Pro या डिव्हाईसबाबत चिनी मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर प्रसिद्ध टिपस्टर WHYLAB ने काही माहिती पोस्ट केली आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen1 (Snapdragon 898) प्रोसेसर देण्यात आला आहे. आधी माहिती समोर आली होती की, हा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह लॉन्च केला जाईल. तथापि, कंपनीने अद्याप या फोनच्या फीचर्सची पुष्टी केलेली नाही. यासोबतच आणखीही अनेक चांगले फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील.

रियलमीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.51 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. तसेच त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे. यामध्ये, बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा फोन 125W च्या फास्ट चार्जरसह सादर केला जाईल. यासोबतच जुन्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या फोनमध्ये 65w चार्जर आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी G2 प्रो चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रियलमीच्या या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने काही संकेत दिले आहेत. रियलमीच्या या फोनची किंमत कदाचित CNY 4,000 (जवळपास 46,500 रुपये) इतकी असू शकते आणि या फोनच्या स्पेशल एडिशनची किंमत CNY 5,000 (जवळपास 58,200 रुपये) इतकी असू शकते.

रियलमीने या वर्षी अनेक परवडणारे 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे विविध फीचर्स आणि किंमतींच्या रेंजमध्ये येतात. यामध्ये 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे अनेक फोन आहेत. त्याच वेळी, काही स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतात. कंपनीने पहिल्यांदा Realme X7 सादर केला.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(Realme GT 2 Pro price and specifications leaked before launch)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.