Realme Narzo 30 सिरीज 24 फेब्रुवारीला बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्मार्टफोन निर्माती कंपनी रियलमीने (Realme) भारतात Narzo 30 स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे.

Realme Narzo 30 सिरीज 24 फेब्रुवारीला बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी रियलमीने (Realme) भारतात Narzo 30 स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीने एका टीझरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, 24 फेब्रुवारीला ते Realme Narzo 30 सिरीज सादर केली जाणार आहे. (Realme Narzo 30 smartphone series is going to launch on 24th february know more about it)

रियलमीच्या अधिकृत संकेस्थळावर लाँचिंग आणि या स्मार्टफोनबाबतची बरीचशी माहिती शेअर करण्यात आली आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारीला दुपारी 12.30 वाजता या सिरीजमधील स्मार्टफोन लाँच केले जातील. या सिरीजमध्ये Realme Narzo 30A आणि Realme Narzo 30 Pro 5G चा समावेश आहे.

Flipkart वर मायक्रोसाईट तयार

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Realme Narzo 30 सिरीजबाबत एक मायक्रोसाईट क्रिएट करण्यात आली आहे. याचाच अर्थ हा स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध केला जाईल. सोबतच या सिरीजमधील स्मार्टफोन रियलमीच्या ऑनलाईन स्टोरवरदेखील उपलब्ध असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवर सध्या दिसत असलेल्या वेबपेजवर दोन स्मार्टफोन्स पाहायला मिळत आहेत. ज्यामधील फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेंसर दिसत आहे. सोबत स्क्वायर शेप आणि आणि रेक्टँगुलर शेप कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळेल. तसेच या पेजवर दिलेल्या माहितीनुसार या सिरिजीमधील स्मार्टफोन रियर माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह सादर केला जाईल.

Realme Narzo 30 सिरीजचे फीचर्स

Flipkart वरील टीझरमध्ये दिलेल्या माहितीनुसार Realme Narzo 30 Pro स्मार्टफोन हा एक 5G स्मार्टफोन असेल. सोबतच हा फोन MediaTek Dimensity 800U 5G प्रोसेसरसह लाँच केला जाईल. Realme Narzo 30 Pro हा स्मार्टफोन TENAA लिस्टिंगवरही स्पॉट झाला आहे. या लिस्टिंगनुसार स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांची स्क्रीन दिली जाईल. सोबतच 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले 120Hz सह सादर केला जाणार आहे.

हेही वाचा

7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका

Vivo भारतीय मार्केटमध्ये धमाका करणार, एप्रिलपर्यंत 11 नवे स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार

(Realme Narzo 30 smartphone series is going to launch on 24th february know more about it)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI