Realme X2 Pro : जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन

Realme जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा फोन Realme X2 Pro या नावाने लाँच केला जाईल. रियलमी युरोपने Realme X2 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोनचे फीचर्स नुकतेच जाहीर केले (worlds fastest charging technology). हा स्मार्टफोन या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

Realme X2 Pro : जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 6:01 PM

मुंबई : Realme जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा फोन Realme X2 Pro या नावाने लाँच केला जाईल. रियलमी युरोपने Realme X2 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोनचे फीचर्स नुकतेच जाहीर केले (worlds fastest charging technology). हा स्मार्टफोन या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनचे जे फीचर्स कन्फर्म केले आहेत, त्यावरुन हा प्रिमिअम फ्लॅगशिप डिव्हाईस असेल, हे लक्षात येतं. याचाच अर्थ Realme X2 Pro हा स्मार्टफोन स्वस्त नसेल.

65W चार्जिंग टेक्नॉलॉजी

स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले शिवाय या स्मार्टफोनमध्ये 65W चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल. ही सध्या जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. तर, Oppo Reno Ace फ्लॅगशिप फोन 65W SuperVOOC 2.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला पहिला स्मार्टफोन असेल (worlds fastest charging technology). लवकरच हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात येईल. 65W SuperVOOC 2.0 चार्जिंग टेक्नॉलॉजीला गेल्याच महिन्यात अधिकृत करण्यात आलं. 65W चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे 4,000 mAh ची बॅटरी फक्त 30 मिनिटांत फुल्ल चार्ज होते. Realme X2 Pro मध्येही याच टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल (worlds fastest charging technology).

सर्वात पावरफुल्ल प्रोसेसर

Realme X2 Pro स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर असेल. सध्या स्मार्टफोनसाठी हा सर्वात पावरफुल्ल चिपसेट आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले अॅप्स, इमेज किंवा वेबपेज स्क्रोल करताना फ्लुड व्युइंग एक्सपिरियन्स ऑफर करेल. सोबतच या स्मार्टफोनमध्ये युझर्सला जबरदस्त गेमिंग एक्सपिरियन्सही मिळेल. हा स्मार्टफोन 20:9 च्या अॅस्पेक्ट रेशिओसोबत येण्याची शक्यता आहे. Realme X2 Pro हा विना नॉच डिस्प्ले सोबत येणार, की वॉटरड्रॉप नॉचसोबत हे पाहावं लागेल. या स्मार्टफोनमध्ये ईन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो.

Realme X2 Pro स्मार्टफोन क्वॉड कॅमरा सिस्टमसोबत येण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या मागच्या बाजुला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा सेन्सर असू शकतो. 64 मेगापिक्सलचा सेन्सर 115 डिग्री अल्ट्रा वाईड लेन्ससोबत येईल, जो मायक्रो शॉट्स शूट करता येतील. त्याशिवाय, हा स्मार्टफोन 20X हायब्रिड झूम सपोर्टही करेल.

संबंधित बातम्या :

Galaxy Fold : सहा कॅमेरे, दोन बॅटरी, सॅमसंगचा फोल्डिंग स्मार्टफोन लाँच

काही महिन्यात ‘या’ स्मार्टफोन्समधून WhatsApp बंद होणार

फेसबुकवरील नंबर गेम संपणार, पोस्टवरील लाईक्स लवकरच बंद

तुमचा फोन किती वेळ खणखणून बंद होतो? टेलिकॉम कंपन्यांना कोट्यवधींचा फरक पडतो!

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.