Realme चा 7000mAh बॅटरी असलेला ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फिचर्स
Realme ने C85 सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या फोनला पॉवरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्ले देण्यात आलेला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन याबद्दल जाणून घेऊयात...

स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Realme कंपनीने त्यांचे C-सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोनRealme C85 5G आणि Realme C85 Pro 4G लाँच केले आहेत. मात्र हे दोन्ही फोन व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही फोनचे सर्वात मोठे फिचर्स म्हणजे त्यांची पॉवरफुल 7,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट. Realme C85 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि डायमेन्सिटी 6300 चिपसेटसह LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे, तर C85 Pro 4G या फोनमध्ये AMOLED स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर आहे. दोन्ही फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि Android 15 आधारित Realme UI 6 आहे.
रियलमीचा या फोनची किंमत आणि रंग पर्याय
व्हिएतनाममध्ये Realme C85 5G या फोनच्या 8GB+256GB मॉडेलच्या किंमत 7,690,000 VND म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 26,100 रुपये आहे. तर Realme C85 Pro 4G या फोनच्या 8GB+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,490,000 VND भारतीय चलनानुसार 22,100 रुपये पासून सुरू होते. 256GB व्हेरिएंटची किंमत 24,100 रुपये आहे. तर हे दोन्ही फोन Parrot Purple आणि Peacock Green या रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
Realme C85 5G: फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Realme C85 5G या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 1,200 nits आहे. हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे, 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे. IP69 प्रोटेक्शनसह यात फोन धूळ आणि पाणी प्रतिरोधक फिचर्स देण्यात आलेले आहे आणि हा फोन 45W जलद चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी पॅक करतो. तर Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.0 आणि USB-C कनेक्टिव्हिटी देखील देते.
Realme C85 Pro 4G: फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Realme C85 Pro 4G मध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4,000 nits आहे. हा Qualcomm Snapdragon 685 चिपसेटने सुसज्ज आहे, 8GB RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात 50MP चा रियर सेन्सर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Android 15-आधारित Realme UI 6 वर चालतो. यात 45W फास्ट चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी, ड्युअल स्पीकर्स, साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP69 रेटिंग देखील आहे.
