AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी नवी भेट, लवकरच जिओ ई-सिम बाजारात दाखल होणार

रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी नवी भेट, लवकरच जिओ ई-सिम बाजारात दाखल होणार (Reliance Jio e-SIM will be launched soon)

रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी नवी भेट, लवकरच जिओ ई-सिम बाजारात दाखल होणार
लवकरच जिओ ई-सिम बाजारात दाखल होणार
| Updated on: Feb 15, 2021 | 5:29 PM
Share

मुंबई : रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देत असते. स्वस्त प्लान, टॅरीफ आणि जिओ फोननंतर आता कंपनी ग्राहकांसाठी ई-सिम घेऊन येत आहे. यामुळे ग्राहकांना फिजिकल सिमची आवश्यकता नाही आणि नेटवर्कचा वापर करणेही ग्राहकांना सोपे हाईल. सध्या 26 स्मार्टफोनमध्ये ई-सिमला सपोर्ट मिळेल. ई-सिम काय आहे आणि ते कसे खरेदी करायचे याबाबत माहिती जाणून घेऊया. (Reliance Jio e-SIM will be launched soon)

कसे आहे ई-सिम?

ई-सिम एक असे एम्बेडेड सिम आहे ज्याचा वापर युजर्स विना फिजिकल सिम कार्ड टेलिकॉम कंपनीच्या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. ई-सिम स्मार्टफोनसाठी डिजिटली डाऊनलोड केले जाते. अद्याप ई-सिम पूर्णपणे लोकप्रिय नाही, परंतु अधिकाधिक उत्पादक सिमसोबत विविध फायदे उपलब्ध करुन देत आहेत.

अशी करा ई-सिमची खरेदी

जर तुम्ही ई-सिम खरेदी करु इच्छित असाल तर यासाठी तुमच्याकडे कॉम्पॅटिबल डिव्हाईस असले पाहिजे. त्यानंतर ई-सिम कनेक्शनसाठी तुमच्या मोबाईलमध्ये जिओ स्टोर, रिलायन्स डिजिटल स्टोर किंवा जिओ रिटेलरकडे आयडी प्रूफ आणि फोटोग्राफ घेऊन जायचे. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तु्म्हाला ई-सिम मिळेल.

असे बनवा फिजिकल सिमला ई-सिम

जर तुम्ही तुमच्या फिजिकल सिमला ई-सिममध्ये कनव्हर्ट करु इच्छित असाल किंवा जिओ ई-सिम एका डिव्हाईसमधून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये ट्रान्सफर करु इच्छित असाल तर यासाठी त्या डिव्हाईसमधून मॅसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुमचे जिओ सिम अॅक्टिव्ह झाले की ई-सिम असलेल्या डिव्हाईसवर कॉन्फिगरेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

या स्मार्टफोन्समध्ये वापरु शकता जिओ ई-सिम

अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या ई-सिम कॉम्पॅटिबल फोन लाँच करीत आहेत. यात अॅपल आणि सॅमसंगचे नाव अग्रस्थानी आहे. अॅपलमध्ये iOS 12.1 किंवा त्याच्या वरच्या व्हर्जनच्या डिव्हाईसमध्ये ई-सिमचा वापर करु शकता. जिओच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अॅपलच्या iPhone XR, iPhone XS, iPhone XS Max, iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone SE (2020), iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro, आणि iPhone 12 Pro Max मध्ये ई-सिमचा वापर करु शकता. याव्यतिरिक्त गुगलच्या Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, आणि Pixel 4a स्मार्टफोनमध्ये तर सॅमसंगच्या Samsung Galaxy Z Flip, Samsung Galaxy Fold, Samsung Galaxy Note 20 Ultra 5G, Samsung Galaxy Note 20, Samsung Galaxy Z Fold 2, Samsung Galaxy S21 5G, Samsung Galaxy S21+ 5G, Samsung Galaxy S21 Ultra 5G, Motorola Razr, और Motorola Razr 5G मध्ये ई-सिम सपोर्ट मिळते.

ई-सिम प्रोफाईल डिलीट झाल्यास काय कराल?

जर तुमचे ई-सिम प्रोफाईल डिलीट झाले तर पुन्हा अॅक्टिवेट करण्यासाठी तुमच्याकडे जिओ स्टोर, रिलायन्स डिजिटल स्टोर किंवा जिओ रिटेलरकडे जाऊन करु शकता. तुमच्या परिसरातील जिओ स्टोरची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही Jio.com वर जाऊ शकता. (Reliance Jio e-SIM will be launched soon)

संबंधित बातम्या

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज

128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.