Reliance Jiophone New Offer : जिओच्या तीन धमाकेदार ऑफर, 1,999 रुपयांमध्ये फोन आणि बरंच काही वर्षभरासाठी FREE

कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) तीन असे ऑफर घेऊन आली आहे ज्यामध्ये तुम्हाला एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभरासाठी सुटका मिळेल (Reliance Jiophone New Three Offer).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:06 PM, 2 Mar 2021
Reliance Jiophone New Offer : जिओच्या तीन धमाकेदार ऑफर, 1,999 रुपयांमध्ये फोन आणि बरंच काही वर्षभरासाठी FREE
jio Offers

मुंबई : जर तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करुन करुन कंटाळला असाल, नवीन फोन (Reliance Jiophone New Three Offer) घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक तुमच्या कामाची बातमी आहे. ग्राहकांसाठी नेहमी धमाकेदार ऑफर आणणारी कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) तीन असे ऑफर घेऊन आली आहे ज्यामध्ये तुम्हाला एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभरासाठी सुटका मिळेल (Reliance Jiophone New Three Offer).

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जियोच्या या ऑफरची सुरुवात 1 मार्चपासून झाली आहे. यामध्ये तुम्हाला 1,999 रुपयांमध्ये एक फोन आणि दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल. त्याशिवाय, तुम्ही इतरही अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

1,999 रुपयांमध्ये फोन आणि बरंच काही FREE

हा ऑफर जियोच्या नव्या ग्राहकांसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला JioPhone सोबतच 24 महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, तुम्हाला अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2GB हायस्पीड डेटा) मिळेल.

1,499 रुपयांमध्ये फोनसोबत वर्षभरासाठी सर्व FREE

हा ऑफरही नव्या ग्राहकांसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला 1,499 रुपयांमध्ये 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड सर्व्हिसची लाभ मिळेल. यामध्ये तुम्हाला JioPhone सोबत अनलिमिटेड वॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2GB हायस्पीड डेटा) मिळेल (Reliance Jiophone Three New Offer).

749 रुपयांमध्ये वर्षभरासाठी सर्व FREE

हा प्लान JioPhone च्या ग्राहकांसाठी आहे. ज्यामध्ये तुम्हाला 749 रुपयांच्या रिचार्जवर वर्षभरासाठी अनलिमिटेड वॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2GB हायस्पीड डेटा) मिळेल. या प्लानचा फायदा तुम्ही आजपासूनसर्व रिलायन्स रिटेल स्टोर्स आणि Jio रिटेलर्सवर घेऊ शकता. जियोने या ऑफर्सची सुरुवात देशाला 2G मुक्त करण्यासाटी केली आहे.

Reliance Jiophone New Three Offer

संबंधित बातम्या :

2 वर्षांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, 1999 रुपयांचा JioPhone कुठून खरेदी करणार?