फास्ट चार्जिंग, स्ट्रॉंग बॅटरी आणि मोठी स्क्रीन, Samsungच्या नव्या 5G फोनची फीचर्स झाली लीक

सॅमसंग गॅलॅक्सी A23 5G या नव्या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन लीक झाली आहेत. या फोनमध्ये 6.6 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून तो फुल एचडी डिस्प्ले आहे. तसेच या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला असून 8 मेगापिक्सेल कॅमेराही उपलब्ध आहे. बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे.

फास्ट चार्जिंग, स्ट्रॉंग बॅटरी आणि मोठी  स्क्रीन, Samsungच्या नव्या 5G फोनची फीचर्स झाली लीक
फास्ट चार्जिंग, स्ट्रॉंग बॅटरी आणि मोठी स्क्रीन, Samsungच्या नव्या 5G फोनची फीचर्स झाली लीक
Image Credit source: tv9
हिरा ढाकणे

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 06, 2022 | 12:57 PM

सॅमसंग कंपनी एका नवा स्मार्टफोनवर काम करत असून त्याचे नाव सॅमसंग गॅलॅक्सी ए23 5जी (Samsung Galaxy A23 5G smartphone) असे आहे. हा फोन अद्याप बाजारात लाँच होण्यापूर्वीच त्याची फीचर्स लीक (Features leaked) झाली आहेत. याबद्दल श्लैसलीक्स ने एक रिपोर्ट पब्लिश केला असून, सॅमसंग ए 23 5जी च्या फीचर्सची माहिती शेअर केली आहे. मात्र सॅमसंग कंपनीतर्फे या रिपोर्ट्सबद्दल कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतीय टिप्स सुधांशू एम्बोर यांनीही इमेज आणि स्पेसिफिकेशन्स परत शेअर केली आहेत. या फोनमध्ये काय फीचर्स आहेत, याबद्दल माहिती जाणून घेऊया. सॅमसंग गॅलॅक्सी ए23 5जी हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट, ऑरेंज आणि ब्ल्यू या चार रंगांमध्ये( 4 colors- black, white, orange and blue) उपलब्ध असेल. या डिव्हाईसमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. या फोनचे वजन साधारणत: 200 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy A23 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन –

सॅमसंग गॅलॅक्सी ए23 5जी या स्मार्टफोनच्या लीक झालेल्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाले तर त्यामध्ये 6.6 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून तो फुल एचडी डिस्प्ले आहे. तसेच फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला असून 8 मेगापिक्सेल कॅमेराही उपलब्ध आहे. बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामध्ये 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड ॲंगल ची लेन्स आणि इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सेलचे असतील, डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असतील.

Samsung Galaxy A23 5G फोनचा प्रोसेसर आणि रॅम –

सॅमसंग गॅलॅक्सी ए23 5जी या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बाबत सांगायचे झाले तर तो स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह सादर होऊ शकतो. त्यासह या फोनमध्ये 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यासह या फोनमध्ये ग्राहकांना 128 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेजही मिळेल. गरज पडल्यास फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy A23 5G ची बॅटरी आणि किंमत

सॅमसंग गॅलॅक्सी ए23 5जी हा फोन ॲंड्रॉइड 12 ओएसवर आधारित यूआय 4.1 (UI 4.1) वर काम करेल. या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी असेल. तसेच त्यामध्ये 25 वॉटचे फास्ट चार्जिंगही असेल. यूरोपीय बाजारात या स्मार्टफोनची किंमत 300 युरो ( अंदाजे 24, 341 रुपये) असेल. सुरूवातीच्या व्हेरिएंटची ही किमत असू शकेल.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें