Signal App मध्ये 8 नवे बदल, WhatsApp ला टक्कर देण्यासाठी लवकर अपडेटेड व्हर्जन

मिळालेली लोकप्रियता कायम राहावी म्हणून सिग्नलने आपल्या फिचर्समध्ये नवीन बदल करण्याचे ठरवले आहे. (Signal app Whatsapp updated version)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:53 AM, 28 Jan 2021
Signal App मध्ये 8 नवे बदल, WhatsApp ला टक्कर देण्यासाठी लवकर अपडेटेड व्हर्जन
सिग्नल अ‌ॅप

मुंबई :  प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून व्हॉट्सअ‌ॅपरच्या (WhatsApp)  या धोरणाला विरोध झाला. काहींनी तर व्हॉट्सअ‌ॅप वापरण्याचे बंद करुन तुलनेने सुरक्षित असलेले सिग्नल (Signal App) हे मेसेजिंग अ‌ॅप वापरण्याचे आवाहन केले. या आवाहनांतर सिग्नल अ‌ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केले गेले. त्याचा वापर करणाऱ्यांची संख्यासुद्धा चांगलीच वाढली आहे. त्यामुळे मिळालेली लोकप्रियता कायम राहावी म्हणून सिग्नलने आपल्या फिचर्समध्ये नवीन बदल करण्याचे ठरवले आहे. नव्या बदलांनुसार आता व्हॉट्सअ‌ॅपमध्ये असणारे अनेक फिचर्स सिग्नल अ‌ॅपमध्येसुद्धा उपलब्ध होणार आहेत. (Signal app will provide the features like Whatsapp in its updated version)

सिग्नलमध्ये नवे फिचर्स कोणते?

 कस्टम वॉलपेपर

व्हॉट्सअ‌ॅपमध्ये कस्टम वॉलपेपरची सुवीधा आहे. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीसोबत चॅट करताना व्हॉट्सअ‌ॅपवर वेगवेगळे वॉलपेपर ठेवता येतात. हे फिचर पहिल्यांदा सिग्नल या अ‌ॅपमध्ये नव्हते. मात्र, यानंतर ही सुविधा सिग्नलकडून पुरवली जाणार असून वेगवेगळ्या व्यक्तींसोबत चॅटींग करताना वापरकर्त्यांना वेगवेगळे वॉलपेपर ठेवता येणार आहे.

 व्हॉट्सअ‌ॅपसरखी व्हिडीओ कॉलींगची सुविधा

व्हॉट्सअ‌ॅपवर एकाच वेळी 8 जणांना व्हिडीओ कॉल करता येतो. लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअ‌ॅपने फिचरमध्ये तसे अपडेट केले होते. या अपडेटमुळे व्हॉट्सअ‌ॅपद्वारे आपण एकाच वेळी आठ जणांशी व्हिडीओद्वारे बोलू शकतो. सिग्नल अ‌ॅपमध्ये ही मर्यादा 5 व्यक्तीपुरती आहे. मात्र, सिग्नल अॅप लवकरच व्हॉट्सअ‌ॅपसारखे फिचर देणार असून सिग्नलमध्येही एकाच वेळी 8 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

अ‌ॅनिमेटेड स्टिकर्स

व्हॉट्सअ‌ॅपमध्ये अ‌ॅनिमेटेड स्टिकर्सचा (Animated stickers) एक अतिशय उत्तम पर्याय युजर्सना उपलब्ध आहे. चॅटिंग करताना युजर्स या अ‌ॅनिमेटेड स्टिकर्सचा उपयोग करु शकतात. अशी कोणतीही सुवीधा सध्या सिग्नल अ‌ॅपमध्ये नाही. मात्र, सिग्नल आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये अ‌ॅनिमटेड स्टिकर्सची सुवीधा देणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, व्हॉट्सअ‌ॅपप्रमाणे स्वत:चे स्टिकर्स तयार करण्याची सुविधासुद्धा सिग्नल देणार असल्याचा म्हटले जात आहे.

मॅसेज बुकमार्क करण्याची सुविधा

कोणत्याही महत्त्वाच्या मेसेजला स्टार  (Starred chats) करण्याची सुविधा व्हॉट्सअ‌ॅपमध्ये आहे. या फिचरमुळे संपूर्ण चॅट डीलिट झाली तरी, स्टार केलले मेसेच सेव्ह करुन ठेवण्यास मदत होते. सिग्नल अ‌ॅपमध्ये अशा प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे महत्त्वाचे मेसेच गहाळ होण्याचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेता आता सिग्नलसुद्धा आपल्या युजर्सना मेसेज स्टार करण्याचे फिचर देणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑटोमॅटिक डाऊनलोड

सिग्नल अ‌ॅपमध्ये फोटो, व्हिडीओ किंवा दुसऱ्या फाईल ऑटोमॅटिक डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये सिग्नलसुद्धा ऑटोमॅटिक मीडिया डाऊनलोड करण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन देणार आहे.

अबाऊट स्टेटस 7 ऑप्शन

सिग्नल अ‌ॅप प्रोफाईल सेक्शनमध्ये 7 अबाऊट स्टेटस ऑप्शनचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामध्ये ‘Speak freely’, ‘Encrypted’, ‘Free to chat’, ‘Coffee lover’, ‘Taking a break’, ‘Be kind’ and ‘Working on something new’ अशा प्रकारचे ऑप्शन असतील. तर व्हॉट्सअ‌ॅपमध्ये एकूण 11 अबाऊट स्टेटसचे ऑप्शन आहेत. ज्यामध्ये ‘Available’, ‘Busy’, ‘At school’, ‘At the movies’, ‘At work’, ‘Battery about to die’, ‘Can’t talk’, ‘WhatsApp only’, ‘in a meeting’, ‘At the gym’, ‘Sleeping’ आणि ‘Urgent calls only’ अशा प्रकारचे स्टेटस ऑप्शन्स आहेत.

लो डेटा मोड

व्हॉट्सअ‌ॅप वापरताना कमी डेटा खर्च व्हावा यासाठी लो डेटा ऑपनचा पर्याय व्हॉट्सअ‌ॅपकडून पुरवला जातो. तर सिग्नलमध्ये सध्या अशी कोणतीही सुविधा नाही. मात्र, सिग्नल आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आपल्या युजर्सना ही सुविधा देऊ शकते.

 सजेशन्स फॉर फॉरवर्ड

कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना व्हॉट्सअ‌ॅपतर्फे युजर्सना कोणाला मेसेज पाठवावा यासाठी सजेशन दिले जातात. तसे सजेशन्स देण्याची सुविधा सिग्नलमध्ये नाही. मात्र, यानंतर सिग्नल आपल्या अ‌ॅपमध्ये तशी सुविधा उपलब्ध करुन देऊ शकते.

संबंधित बातम्या :

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

WhatsApp, Signal, Telegram सारख्या 15 मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील मेसेजला एकाच अ‍ॅपने रिप्लाय करा

(Signal app will provide the features like Whatsapp in its updated version)