64MP गिम्बल कॅमेरा, 60X झूमसह Tecno चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स

Tecno ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो अनेक दमदार फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव आहे Tecno Camon 18 Premier.

64MP गिम्बल कॅमेरा, 60X झूमसह Tecno चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 6:49 PM

मुंबई : Tecno ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो अनेक दमदार फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव आहे Tecno Camon 18 Premier. त्याच्या मुख्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन त्याच्या बॅक पॅनलवर गिम्बल कॅमेरा लेन्ससह सुसज्ज आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच, याला 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. (Tecno Camon 18 Premier launched in India, check price, specifications)

Tecno ने या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्लॅश इनेबल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी खूप उपयुक्त ठरेल. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळेल. तसेच, त्याची बॅटरी फक्त 30 मिनिटांत 64 टक्के चार्ज होऊ शकते.

Tecno Camon 18 Premier चे स्पेसिफिकेशन

या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये पंच होल देखील आहे. त्यात सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे. फुल एचडी प्लस असलेले हे पॅनल आणि त्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. जे 550 निट्स ब्राइटनेस प्रदान करते. तसेच, यामध्ये 120hz चा रिफ्रेश रेट मिळेल. हा फोन गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव सुधारतो.

Tecno Camon 18 Premier प्रोसेसर

हा हँडसेट Hi OS 8.0 बेस्ड अँड्रॉयड 11 ओएस पर काम करतो. या फोनमध्ये युजर्सना मीडियाटेक हेलियो जी 96 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेसदेखील देण्यात आली आहे.

Tecno Camon 18 Premier ची बॅटरी आणि चार्जिंग क्षमता

या फोनमध्ये युजर्सला 4750 mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 30 मिनिटांत 64 टक्के चार्ज होते. हा ड्युअल सिम फोन आहे. यात वायफाय 5, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि टाइप सी यूएसबी पोर्ट आहे. तसेच यात 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

Tecno Camon 18 Premier चा कॅमेरा सेटअप

या टेक्नो स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जो ड्युअल एलईडी फ्लॅश लाइटसह येतो. तसेच, मागील पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. यात 12 मेगापिक्सेल गिंबल स्टेबलाइज्ड 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तिसरा कॅमेरा 8-मेगापिक्सलची पेरिस्कोप झूम लेन्स आहे, जी 60X हायपरझूम देते. कंपनीने त्यात मून फीचर दिले आहे, जे Galileo algorithm अंतर्गत मून शॉट्स घेण्यास मदत करते.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Tecno Camon 18 Premier launched in India, check price, specifications)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.