Xiaomi Mi 11 Lite | धमाका… 2021 चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 8GB पर्यंत मिळेल RAM

तुमचा फोन खराब झाला आहे. किंवा तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात आहात. पण बजेटचा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही घेऊन आलो आहे 2021 चा सर्वात स्वस्त फोन धमाकेदार ऑफरसोबत. शियोमी कंपनी ग्राहकांसाठी कायम खिशाला परवडणारे फोन बाजारात आणते. पण आता या कंपनीने त्यांचा सगळ्या स्वस्त फोनवर जोरदार ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकल्यावर तुम्हाला 2021 मधील सगळ्यात गूड डील मिळाल्याचा आनंद होईल. आणि निमित्त आहे Mi Flagship Days 2021चं.

Xiaomi Mi 11 Lite | धमाका... 2021 चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 8GB पर्यंत मिळेल RAM
Xiaomi Mi 11 Lite
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:18 AM

मुंबई : आपण 2021 ला अलविदा करायला आणि 2022 च्या स्वागताची तयारी करत आहोत. अशात मग इलेक्ट्रॉनिक कंपनी का मागे राहतील. शियोमी (Xiaomi) आपल्या ग्राहकांना एकशेएक ऑफर्स देऊन कायम बेस्ट डील देते. शियोमीने आपल्या स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आणली आहे. त्यांचा सगळ्यात स्वस्त फोनवर बंपर ऑफरची घोषणा केली आहे. Mi Flagship Days 2021 च्या सेलमध्ये ग्राहकांना कंपनीच्या फ्लॅगशिपवर ऑफर मिळत आहेत.

काय आहे ही बंपर ऑफर

2021 चा सर्वात पातळ आणि हलका स्मार्टफोन Xiaomi Mi 11 Lite हा स्वस्तात मिळणार आहे. Mi.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, Mi 11 lite 21,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना मिळणार आहे.

एक्सचेंजचाही पर्याय

ही आहे सर्वात धमाकेदार ऑफर. तुम्ही स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. या ऑफरवर 21,600 रुपयांची सूट देण्यात येणार आहे आणि Mi रिवॉर्डमध्ये 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.

Mi 11 Lite स्मार्टफोनची खासियत

Mi 11 Lite मध्ये 6.55-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले असा हा स्मार्टफोन आहे. तसेच 60 सोबतच 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशो आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 चे संरक्षण देखील आहे. या स्मार्टफोनची टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतकी आहे. शिवाय या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर लेन्स आहे. त्यासोबत Adreno 618 GPU आणि 8GB पर्यंत रॅमसह हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. या फोनमध्ये दोन स्टोरेजची क्षमता असून 6 GB RAM आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज आहे. तेही 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.

64 मेगापिक्सल कॅमेरा

या फोनमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा असून ट्रिपल लेन्स देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आणि 5 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे. तर फ्रंट कॅमेऱ्याची लेन्स 16 मेगापिक्सल्सची आहे. फोनचा कॅमेरा 30fps फ्रेम दराने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. तर कमी प्रकाशातील शूटसाठी एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे.

कशी आहे स्मार्टफोनची बॅटरी

या फोनमध्ये 4,250 mAh बॅटरीसोबत जी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. तर फोनसोबत 33 W चा चार्जर मिळणार आहे. तर फोनमध्ये USB Type-C पोर्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोनमध्ये 3.5 mm हेडफोन जॅक नाही. तर फोनची जाडी फक्त 6.8 मिमी आणि वजन 157 ग्रॅम आहे. या फोनचं वजन कमी करण्यासाठी कंपनीने मॅग्नेशियम मिश्र धातुचा वापर केला आहे.

संबंधित बातम्या :

WhatsApp वर एक मेसेज करा आणि काही सेकंदात Vaccine Certificate मिळवा

आता पळवाट नाही, तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.