AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme Narzo 70 Pro 5G, तुमच्या हाताच्या इशाऱ्यावर अशी करेल करामत

Realme Narzo 70 Pro 5G | हा स्मार्टफोन सध्या एकदम चर्चेत आला आहे. यामधील फीचर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रियलमी एक जोरदार फोन आहे. या फोनमध्ये एक खास फीचर आहे. त्याच्या मदतीने तुम्ही फोनला हात न लावता केवळ इशाऱ्याने त्यावर नियंत्रण मिळवू शकता.

Realme Narzo 70 Pro 5G, तुमच्या हाताच्या इशाऱ्यावर अशी करेल करामत
| Updated on: Mar 20, 2024 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली | 20 March 2024 : Realme ने त्याचा मिड-रेंज स्मार्टफोन Realme Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारात उतरवला आहे. या स्मार्टफोनची लाँचिंगपूर्वीच खूप चर्चा रंगली आहे. या कंपनीने भुतकाळापासून बोध घेतल्याची बाजारात चर्चा आहे. या फोनमध्ये आता इनबिल्ट ॲपची संख्या एकदम रोडवली आहे. ब्लोटवेअर ॲप्स इन्स्टॉल असतील. पण त्यांचे प्रमाण अगदी 65 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना हेरगिरी करणाऱ्या चीनचा ॲप्सची भीती कमी झाली आहे. या फोनमध्ये अजून एक खास फीचर आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही फोनला हात न लावता केवळ इशाऱ्याने त्यावर नियंत्रण मिळवू शकता. त्याची पण बाजारात मोठी चर्चा सुरु आहे. हा फोन ग्राहकांना Amazon वर पण सहज मिळू शकतो.

Realme Narzo 70 Pro 5G Specifications

  1. या स्मार्टफोनमध्ये क्रिएटिव्ह एअर जेस्चर कंट्रोल देण्यात आले आहे. त्याच्या मदतीने ग्राहकांना फोनला हात न लावता हाथाच्या हालचालीवरुन स्क्रीनवर कंट्रोल करता येईल.
  2. रिअलमी नार्जो 70 प्रो 5जी स्मार्टफोन मध्ये 2000 निट्सचा पीक ब्राईटनेस आणि रेनवॉटर स्मार्ट टच सपोर्ट मिळेल.
  3. दमदार कामगिरीसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 5जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. पण अजून 8 जीबी व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  4. या स्मार्टफोनमध्ये 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 5000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Sony IMX890 कॅमरा सेन्सर फोनची फोटो, व्हिडिओचा दर्जा टिकवून ठेवेल.

Realme Narzo 70 Pro 5G Price in India

  • Realme Narzo 70 Pro 5G या स्मार्टफोनची टक्कर Redmi Note 13, iQOO Z9 5G, Poco X6 Neo आणि Nothing Phone 2a या स्मार्टफोनशी होईल. बाजारात कमी किंमतीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • हा स्मार्टफोन मंगळवारी भारतीय बाजारात आल्यापासून या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होत आहे. कॅमेरा, स्टोरेज आणि फीचर्सप्रमाणे किंमतीत बदल दिसून येईल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.