AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन्यथा येत्या 2 दिवसांत Facebook, Twitter आणि Instagram बंद होणार?, सरकारचे आदेश धूळखात

देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच Facebook, Twitter आणि Instagram समोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

...अन्यथा येत्या 2 दिवसांत Facebook, Twitter आणि Instagram बंद होणार?, सरकारचे आदेश धूळखात
Twitter, Instagram, facebook
| Updated on: May 24, 2021 | 8:51 PM
Share

नवी दिल्ली : देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इंस्टाग्रामसमोर (Instagram) एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती, जी मुदत 26 मे रोजी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे आता Facebook, Twitter आणि Instagram हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात 2 दिवसांनंतर बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता नव्याने सुरु झालेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo ने सरकारच्या नियमांचे पालन करण्यास सुरवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Twitter, Instagram, facebook can face Trouble after May 26th in India for not accepting government directions)

भारतात सोशल मीडिया वेबसाइट्स इंटरमीडिएट म्हणून काम करतात आणि जर एखादी व्यक्ती सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट किंवा पोस्ट करत असेल तर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीवर कारवाई होत नाही, कारण त्यांना भारत सरकारकडून मोकळीक मिळते. परंतु जर इंडिया टीव्हीने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, असे समजते की, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामला सरकारने जी मोकळीक दिलीय, ती 26 मे रोजी संपणार आहे. 26 मे पर्यंत या सूचना मान्य न केल्यास सरकार संबंधित सोशल मीडिया साईट्स बंद करु शकते. भविष्यात कोणताही युजर संबंधित सोशल मीडिया साइटवर आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर त्या युजरसह संबंधित सोशल मीडिया साइटवर कारवाई केली जाऊ शकते.

काय आहेत सरकारचे आदेश?

25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिन्यांच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रकाशित केले गेले होते. आदेशानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले गेले होते. तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे आवश्यक आहे. या आदेशात असेही म्हटले होते की, सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल.

सरकारडून तीन महिन्यांची मुदत

25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स अॅड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे. आतापर्यंत कू नावाच्या कंपनीशिवाय इतर कोणत्याही कंपनीने या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही.

इतर बातम्या

लाँचिंगआधीच PUBG वर बंदीची मागणी, ‘या’ आमदाराचं थेट पंतप्रधानांना पत्र

15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स

LCD आणि LED टीव्हीमध्ये फरक काय? कोणता टीव्ही खरेदी करायला हवा?

(Twitter, Instagram, facebook can face Trouble after May 26th in India for not accepting government directions)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.