AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेब्रुवारीमध्ये बाजारात येणार 5 नवे स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि तपशील

या महिन्यात मार्केटमध्ये 5 धमाकेदार स्मार्टफोन भारतीय बाजारात येऊ शकतात. येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा एक उत्तम फीचर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे फोन कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत उत्कृष्ट ठरतील. मात्र यासर्व फोनवर भारी पडणारा Samsung Galaxy A36 कधी लाँच होणार आणि त्याचे फीचर्स कसे असतील हे जाणून घेऊयात.

फेब्रुवारीमध्ये बाजारात येणार 5 नवे स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि तपशील
| Edited By: | Updated on: Feb 05, 2025 | 3:42 PM
Share

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच या महिन्यात तुम्हाला 5 नवे स्मार्टफोन पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या पर्यायांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आगामी स्मार्टफोनच्या यादीमध्ये शाओमीचा फ्लॅगशिप फोन, मिड-बजेटVivo V50 सीरिज आणि ASUS ROG Phone 9 सीरिजचा समावेश आहे. आगामी स्मार्टफोन गेमिंगसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. मात्र या सर्वांवर Samsung Galaxy A36 चा प्रभाव पडू शकतो. चला जाणून घेऊयात या सर्व फोनचे फीचर्स आणि इतर तपशील…

Realme P3 Pro

Realme P3 Pro च्या लाँचबद्दल बोलायचे झाले तर या फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. याची संभाव्य किंमत 10 ते 20 हजार रुपये असू शकते. तसेच यात तुम्हाला 6.70 इंचाची डिस्प्ले मिळेल. Qualcomm Snapdragon 7s जनरेशन 2 चिपसेटने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5200mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

iQOO Neo 10R

iQOO Neo 10R या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या मध्यात लाँच करण्यात येणार आहे. तसेच हा फोन Snapdragon 8s जनरेशन 3 चिपसेटने सुसज्ज असू शकतो. फोनमध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले पाहायला मिळण्याची संभाव्यता आहे. फोन दमदार कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.

Vivo V50 सीरीज

वीवोचा हा फोन 40 ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो. या सीरीजमध्ये Vivo V50 आणि V50 Pro येऊ शकतात. येणारा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. फोनमध्ये फोटो-वीडियोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy A36/ Galaxy A56

सॅमसंग त्यांच्या लोकप्रिय गॅलक्सी A सिरीजचे लॉन्च या महिन्यात करू शकते. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन Galaxy A36 आणि Galaxy A56 समाविष्ट होऊ शकतात. आगामी सिरीजमध्ये कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन कॅमेरा आणि फीचर्स सादर करू शकते. सध्या याच्या लॉन्चची माहिती समोर आलेली नाही.

ASUS ROG Phone 9

या मालिकेत दोन स्मार्टफोन ASUS ROG Phone 9 आणि ROG Phone 9 प्रो बाजारात येऊ शकतात. हे फोनही फेब्रुवारीमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. तसेच हा फोन Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे. ग्राहकांना या फोनमध्ये 5800mAh ची बॅटरी मिळणार आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.