High-Speed Night Data offer | खुशखबर ! ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना रात्री मोफत इंटरनेट, जाणून घ्या अटी

Vi कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर जारी केली आहे. प्रिपेड युजर्ससाठी ही खास ऑफर आहे. (Vi High Speed Night Data offer)

  • Updated On - 12:06 am, Wed, 17 February 21
High-Speed Night Data offer | खुशखबर ! 'या' कंपनीच्या ग्राहकांना रात्री मोफत इंटरनेट, जाणून घ्या अटी
VI

मुंबई : Vi कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर जारी केली आहे. प्रिपेड युजर्ससाठी ही खास ऑफर आहे. नव्या ऑफरनुसार 249 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता रात्री अनलिमेटेड हायस्पीड डेटा मिळणार आहे. रात्री 12 ते सकाळी 6 या कालावधीत ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येईल. (Vi Unlimited High Speed Night Data offer for prepaid users)

व्होडाफोन आयडीया या टेलीकॉम कंपनीने जाहीर केल्यानुसार या योजनेचा फायदा प्रिपेड ग्राहकांना घेता येईल. ज्या ग्रहकांनी 249 रुपयांचे किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज केलेले असेल, त्यांना रात्री 12 ते 6 या कालावधित अनलिमिटेड डाटा वापरता येईल. तसेच, नव्या प्लॅननुसार आता ग्राहकांना विकेन्ड डाटा रेलओव्हरचाही फायदा मिळेल. सोमवार ते शुक्रवार या कालावधित शिल्लक राहिलेला डाटा ग्राहकांना शनिवार आणि रविवारी वापरता येईल. या नव्या ऑफरमुळे ग्राहकांना मनोरंजनाचा आनंद लुटता येईल. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मचाही जास्त काळ आनंद घेता येईल, असा दावा वोडाफोन आयडिया या कंपनीने केला आहे.

दरम्यान, Ookla या ब्रॉडबॅन्ड स्पीड टेस्ट करणाऱ्या संस्थेने व्होडाफोन आयडीया या टेलकॉम कंपनीच्या इंटरनेटची स्पीड सर्वात जास्त असल्याचे सांगितले आहे. मागील तिमाहीत ही स्पीड अनुक्रमे 13.74Mbps आणि 6.19Mbps असल्याचे Ookla संस्थेने म्हटले आहे. त्यांनतर एअरटेल या कंपनीचा क्रमांक येतो.

 

इतर बातम्या :

Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार

व्होडाफोनची ऑफर, ग्राहकांना मिळणार 50 जीबी एक्स्ट्रा डेटा, जाणून घ्या सविस्तर

Airtel, Vodafone नव्हे, ‘ही’ कंपनी 200 रुपयांत सर्वाधिक डेटा देतेय, जाणून घ्या सर्व कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स

(Vi Unlimited High Speed Night Data offer for prepaid users)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI