64MP बॅक, 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo शानदार स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo लवकरच आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे, ज्याचे नाव Vivo V23e असेल आणि यात 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनचा एक हँड्स-ऑन व्हिडिओ आता रिलीज झाला आहे.

64MP बॅक, 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo शानदार स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Vivo V23e
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 8:43 AM

मुंबई : Vivo लवकरच आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे, ज्याचे नाव Vivo V23e असेल आणि यात 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनचा एक हँड्स-ऑन व्हिडिओ आता रिलीज झाला आहे. यापूर्वी हा फोन ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट केलेला दिसला होता, जे दर्शविते की हा फोन लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि आता लॉन्च होण्यासाठी जास्त वेळ शिल्लक नाही. आता एका प्रसिद्ध टिपस्टर चुनने ट्विटरद्वारे Vivo च्या या फोनबद्दल माहिती दिली आहे. (Vivo V23e ready to launch, know price and features)

ताज्या रिपोर्टनुसार, या Vivo स्मार्टफोनला बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल, तर फ्रंटला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान लाँच होऊ शकतो, लीक्सच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आहे. परंतु आतापर्यंत कंपनीने या माहितीची पुष्टी केलेली नाही.

Vivo V23e चं डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स

हँड्स-ऑन व्हिडिओनुसार, यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये OLED पॅनल उपलब्ध असेल. तसेच, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. त्याच्या मागील पॅनलवर काचेची आणि प्लास्टिकची फ्रेम आहे.

यात उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आहे, ज्यामध्ये पॉवर बटण उपलब्ध असेल. एजवर मायक्रोफोन दिसेल आणि तळाशी सिम स्लॉट देण्यात आला आहे. यात टाइप सी यूएसबी पोर्ट मिळेल. यात ग्रिल स्पीकर्स आहेत. सोबत 3.5 मिमी जॅक दिला आहे.

कॅमेरा सेटअप

Vivo V23e च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर एक वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल मिळेल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. यामध्ये, सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलच्या लेन्ससह असेल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. तसेच, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. 4030mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच, हा स्मार्टफोन Funtouch 12 आधारित Android 12 वर काम करेल. हा 5G रेडी स्मार्टफोन असेल.

Vivo V23e ची किंमत

लीक्स रिपोर्टनुसार, व्हिएतनाममध्ये या स्मार्टफोनची किंमत VND 10,000,000 (जवळपास 32,668 रुपये) असू शकते. स्मार्टफोनच्या रिटेल बॉक्समध्ये इयरफोन्स, यूएसबी टाइप सी, 3.5 मिमी जॅक डोंगल आणि काही यूजर मॅन्युअल इत्यादींचा समावेश असेल.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Vivo V23e ready to launch, know price and features)

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.